iPhone वर स्टेटस आयकॉनचा अर्थ जाणून घेणे
स्क्रीनच्या शीर्षस्थानी स्टेटस बारमधील आयकॉन iPhone बद्दल माहिती प्रदान करतात. Face ID सह iPhone वर, कंट्रोल सेंटर च्या शीर्षस्थानी अतिरिक्त स्टेटस आयकॉन आहेत.
नोट : जर तुम्ही ’फोकस’ चालू केले, तर त्याचा आयकॉन स्टेटस बारमध्ये दिसेल.
स्टेटस आयकॉन | ह्याचा अर्थ काय होतो | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() | Wi-Fi. Wi-Fi नेटवर्कवर इंटरनेटशी iPhone कनेक्ट केलेला आहे. उपलब्ध नेटवर्क बघणे आणि Wi-Fi ला कनेक्ट करणे पहा. | ||||||||||
![]() | सेल सिग्नल. बारची संख्या तुमच्या मोबाइल सेवेची सिग्नल स्ट्रेन्ग्थ दर्शवते. जर सिग्नल नसेल, तर “सेवा नाही” दिसेल. | ||||||||||
![]() | ड्यूअल सेल सिग्नल. ड्युअल SIM असलेल्या मॉडेलवर, बारची वरची रो तुम्ही मोबाइल डेटासाठी वापरत असलेल्या लाइनची सिग्नल स्ट्रेन्ग्थ दर्शवते. बारची खालची रो तुमच्या इतर लाइनची सिग्नल स्ट्रेन्ग्थ दर्शवते. जर सिग्नल नसेल, तर “सेवा नाही” दिसेल. संबंधित मोबाइल प्लॅन लेबल आणि नेटवर्क प्रोव्हायडरच्या नावांसह स्टेटस आयकॉन पाहण्यासाठी, कंट्रोल सेंटर उघडा. | ||||||||||
![]() | विमान मोड. विमान मोड सुरू आहे—तुम्ही फोन कॉल करू शकत नाही आणि इतर वायरलेस फंक्शन डिसेबल केले जाऊ शकतात. प्रवासासाठी सेटिंग निवडा पहा. | ||||||||||
![]() | 5G. तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 5G नेटवर्क उपलब्ध आहे आणि सपोर्ट केलेली मॉडेल त्या नेटवर्कद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतात (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही). तुमच्या iPhone सह 5G वापरा ह्याबाबत Apple सपोर्ट लेख पहा. | ||||||||||
![]() | 5G UC. तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 5G UC नेटवर्क उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 5G उच्च वारंवारता व्हर्जन समाविष्ट असू शकते. सपोर्ट केलेली मॉडेल त्या नेटवर्कद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतात (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही). तुमच्या iPhone सह 5G वापरा ह्याबाबत Apple सपोर्ट लेख पहा. | ||||||||||
![]() | 5G+. तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 5G+ नेटवर्क उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 5G उच्च वारंवारता व्हर्जन समाविष्ट असू शकते. सपोर्ट केलेली मॉडेल त्या नेटवर्कद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतात (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही). तुमच्या iPhone सह 5G वापरा ह्याबाबत Apple सपोर्ट लेख पहा. | ||||||||||
![]() | 5G UW. तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 5G UW नेटवर्क उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 5G उच्च वारंवारता व्हर्जन समाविष्ट असू शकते. सपोर्ट केलेली मॉडेल त्या नेटवर्कद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतात (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही). तुमच्या iPhone सह 5G वापरा ह्याबाबत Apple सपोर्ट लेख पहा. | ||||||||||
![]() | 5G E. तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 5G E नेटवर्क उपलब्ध आहे आणि iPhone त्या नेटवर्कद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतो (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही). मोबाइल डेटा सेटिंग बघा किंवा बदला पहा. | ||||||||||
![]() | LTE. तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे LTE नेटवर्क उपलब्ध आहे आणि iPhone त्या नेटवर्कद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतो (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही). मोबाइल डेटा सेटिंग बघा किंवा बदला पहा. | ||||||||||
![]() | UMTS. तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 4G UMTS (GSM) किंवा LTE नेटवर्क (नेटवर्क प्रोव्हायडरनुसार) उपलब्ध आहे आणि iPhone त्या नेटवर्कद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतो (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही). मोबाइल डेटा सेटिंग बघा किंवा बदला पहा. | ||||||||||
![]() | UMTS/EV-DO. तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 3G UMTS (GSM) किंवा EV-DO (CDMA) नेटवर्क उपलब्ध आहे आणि iPhone त्या नेटवर्कद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतो. मोबाइल डेटा सेटिंग बघा किंवा बदला पहा. | ||||||||||
![]() | EDGE. तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे EDGE (GSM) नेटवर्क उपलब्ध आहे आणि iPhone त्या नेटवर्कद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतो. मोबाइल डेटा सेटिंग बघा किंवा बदला पहा. | ||||||||||
![]() | GPRS/1xRTT. तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे GPRS (GSM) किंवा 1xRTT (CDMA) नेटवर्क उपलब्ध आहे आणि iPhone त्या नेटवर्कद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतो. मोबाइल डेटा सेटिंग बघा किंवा बदला पहा. | ||||||||||
![]() | फक्त SOS. तुमच्या मोबाइल सेवा प्रदात्याकडून पूर्ण सेवा उपलब्ध नाही, परंतु इतर नेटवर्क प्रोव्हायडर नेटवर्कद्वारे आपत्कालीन कॉल शक्य आहेत (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाहीत). आपत्कालीन सेवांशी संपर्क साधण्यासाठी SOS वापरा पहा. | ||||||||||
![]() | सॅटेलाइट फीचर्स. आपत्कालीन SOS, ’शोधाशोध’, ‘रोडसाइड सहायता’ आणि ‘उपग्रहाच्या माध्यमातून संदेश’ तुमच्या स्थानावर उपलब्ध आहेत (iPhone 14 आणि नंतरच्या व्हर्जनवर सपोर्ट केलेले). उपग्रहाद्वारे आपत्कालीन SOS वापरा पहा. | ||||||||||
![]() | Wi-Fi कॉलिंग. Wi-Fi कॉलिंगसाठी iPhone सेट अप केलेला आहे. iPhone देखील आयकॉनच्या पुढे नेटवर्क प्रोव्हायडरचे नाव दाखवतो. Wi-Fi वापरून कॉल करा पहा. | ||||||||||
![]() | वैयक्तिक हॉटस्पॉट कनेक्शन. iPhone दुसऱ्या डिव्हाइसच्या वैयक्तिक हॉटस्पॉटद्वारे इंटरनेटशी कनेक्ट केलेला आहे. वैयक्तिक हॉटस्पॉट जॉइन करणे पहा. | ||||||||||
![]() | VPN. iPhone हा VPN वापरून नेटवर्कशी कनेक्ट केलेला आहे. | ||||||||||
![]() | नॅव्हिगेशन. iPhone टर्न बाय टर्न दिशानिर्देश प्रदान करत आहे. ड्रायव्हिंग दिशानिर्देश मिळवा पहा. | ||||||||||
![]() | वैयक्तिक हॉटस्पॉट. iPhone वैयक्तिक हॉटस्पॉट प्रदान करत आहे. वैयक्तिक हॉटस्पॉट वापरून तुमचे इंटरनेट कनेक्शन शेअर करा पहा. | ||||||||||
![]() | फोन कॉल. iPhone फोन कॉलवर आहे. फोन कॉल करा पहा. | ||||||||||
![]() | FaceTime. iPhone हा FaceTime कॉलवर आहे. FaceTime कॉल करा पहा. | ||||||||||
![]() | स्क्रीन रेकॉर्डिंग. iPhone तुमची स्क्रीन रेकॉर्ड करत आहे. स्क्रीन रेकॉर्डिंग घ्या पहा. | ||||||||||
![]() | कॅमेरा वापरला जात आहे. ॲप तुमचा कॅमेरा वापरत आहे. तुमच्या iPhone वर कॅमेरा आणि मायक्रोफोनमध्ये कोणत्या ॲपना ॲक्सेस आहे हे नियंत्रित करणे पहा. | ||||||||||
![]() | मायक्रोफोन वापरला जात आहे. ॲप तुमचा मायक्रोफोन वापरत आहे. तुमच्या iPhone वर कॅमेरा आणि मायक्रोफोनमध्ये कोणत्या ॲपना ॲक्सेस आहे हे नियंत्रित करणे पहा. | ||||||||||
![]() | सिंक होत आहे. iPhone तुमच्या संगणकासह सिंक केला जात आहे. तुमचा iPhone इतर डिव्हाइसेससह सिंक करणे पहा. | ||||||||||
![]() | नेटवर्क ॲक्टिव्हिटी. नेटवर्क ॲक्टिव्हिटी असल्याचे दाखवले जाते. काही थर्ड पार्टी ॲप सक्रिय प्रक्रिया दाखवण्यासाठी देखील ह्याचा वापर करू शकतात. इंटरनेटला कनेक्ट करा पहा. | ||||||||||
![]() | कॉल फॉरवर्डिंग. कॉल फॉरवर्डिंग सेट अप केले आहे. कॉल फॉरवर्डिंग सेट अप करा पहा. | ||||||||||
![]() | लॉक. iPhone लॉक केला गेला आहे. iPhone सक्रिय आणि अनलॉक करा पहा. | ||||||||||
![]() | 'डू नॉट डिस्टर्ब'. ‘डू नॉट डिस्टर्ब’ चालू आहे. Focus चालू करा किंवा शेड्यूल करा पहा. | ||||||||||
![]() | पोर्ट्रेट ओरिएंटेशन लॉक. iPhone स्क्रीन पोर्ट्रेट ओरिएंटेशनमध्ये लॉक आहे. स्क्रीन ओरिएंटेशन बदला किंवा लॉक करा पहा. | ||||||||||
![]() | स्थान सेवा. ॲप स्थान सेवा वापरत आहे. कोणती ॲप्स तुमच्या iPhone चे स्थान वापरू शकतात हे नियंत्रित करणे पहा. | ||||||||||
![]() | अलार्म. अलार्म सेट केला आहे. अलार्म सेट करा पहा. | ||||||||||
![]() | हेडफोन कनेक्ट केलेले आहेत. iPhone हा Bluetooth® हेडफोनसह पेअर केलेला आहे, जे चालू केलेले आहेत आणि Bluetooth च्या रेंजमध्ये आहेत. Bluetooth हेडफोन सेटअप करा आणि ऐका पहा. | ||||||||||
![]() | बॅटरी. iPhone ची बॅटरी पातळी दाखवते. आयकॉन पिवळा असतो तेव्हा ‘लो पॉवर’ मोड चालू असतो. iPhone च्या बॅटरीची टक्केवारी दाखवणे पहा. | ||||||||||
![]() | बॅटरी चार्जिंग. iPhone बॅटरी चार्ज होत आहे. बॅटरी चार्ज करा पहा. | ||||||||||
![]() | Bluetooth बॅटरी. पेअर केलेल्या Bluetooth डिव्हाइसच्या बॅटरीची पातळी दाखवली जाते. Bluetooth ॲक्सेसरीशी कनेक्ट करा पहा. | ||||||||||
![]() | AirPlay. AirPlay चालू आहे. व्हिडिओ आणि छायाचित्रे स्ट्रीम करा पहा. | ||||||||||
![]() | व्हॉइस कंट्रोल. सेटिंग > ‘ॲक्सेसिबिलिटी’ मध्ये ‘व्हॉइस कंट्रोल’ चालू केलेले आहे आणि तुम्ही तुमचा आवाज वापरून iPhone बरोबर संवाद साधू शकता. | ||||||||||
![]() | TTY. सॉफ्टवेअर RTT / TTY किंवा हार्डवेअर TTY चालू केलेले आहे. RTT आणि TTY सेट अप करा आणि वापरा पहा. | ||||||||||
![]() | CarPlay. CarPlay ला iPhone कनेक्ट केलेला आहे. CarPlay ला कनेक्ट करा पहा. | ||||||||||
![]() | Siri Eyes Free. तुम्ही तुमच्या कारमध्ये Siri ला प्रश्न विचारू शकता किंवा विनंती करू शकता. तुमच्या कारमध्ये Siri वापरणे पहा. |