iPhone वर संपर्क संपादित करणे
एखाद्या संपर्काला छायाचित्र असाइन करा, उच्चार आणि सर्वनाम समाविष्ट करा, लेबल बदला, वाढदिवस समाविष्ट करा आणि बरेच काही करा.
तुमच्या iPhone वर संपर्क ॲपवर
जा.
‘संपर्क’ वर टॅप करा, नंतर ‘संपादित करा’ वर टॅप करा.
संपर्काची माहिती प्रविष्ट करा किंवा अपडेट करा.
तुमचे काम पूर्ण झाल्यावर, ’पूर्ण’ वर टॅप करा.
ड्युअल SIM असलेल्या मॉडेल वर, तुम्ही एखाद्या संपर्काला जेव्हा कॉल करता किंवा टेक्स्ट पाठवता, तेव्हा ह्या संपर्कासह मागील संवादाच्या वेळी तुम्ही वापरलेली तीच लाइन iPhone डिफॉल्ट म्हणून वापरतो. फोन कॉल आणि SMS/MMS संदेश संवादासाठी तुमच्या पसंतीची लाइन निवडण्यासाठी, संपर्क सिलेक्ट करा, ‘डिफॉल्ट’ (संपर्क नावाखाली) वर टॅप करा, त्यानंतर लाइन निवडा.
तुमच्या संपर्कांची क्रमवारी कशी लावायची आणि ते कसे डिस्प्ले होतील हे बदलण्यासाठी, सेटिंग > ॲप > ‘संपर्क’ वर जा.