iPhone ला गेम कंट्रोलरशी कनेक्ट करणे
तुम्ही Bluetooth® किंवा Lightning किंवा USB-C कनेक्टरद्वारे सुसंगत गेम कंट्रोलरला तुमच्या iPhone शी कनेक्ट करू शकता. फ्रेंडकडून मदत मिळवण्यासाठी तुम्ही बटणे कस्टमाइझ करू शकता आणि दुसरा कंट्रोलरदेखील समाविष्ट करू शकता.
Bluetooth गेम कंट्रोलर पेअर करणे
कंट्रोलरला शोध मोडमध्ये ठेवण्यासाठी त्याबरोबर आलेल्या सूचनांचे पालन करा.
iPhone वर, सेटिंग
> ‘Bluetooth’ वर जा, Bluetooth चालू करा, नंतर डिव्हाइसच्या नावावर टॅप करा.
तुमच्या Apple डिव्हाइसला वायरलेस गेम कंट्रोलर कनेक्ट करा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Lightning किंवा USB-C कनेक्टरद्वारे गेम कंट्रोलर कनेक्ट करणे
जर तुमच्याकडे सुसंगत गेम कंट्रोलर असेल, तर तुम्ही Lightning किंवा USB-C कनेक्टर वापरून त्याला iPhone शी कनेक्ट करू शकता. तुमच्या iPhone मॉडेल आणि कंट्रोलरनुसार, तुम्हाला अडॅप्टरची आवश्यकता असू शकते (स्वतंत्रपणे विकले गेलेले). तुमच्या कंट्रोलरसह आलेल्या सूचनांचे पालन करा.
गेम कंट्रोलर बटणे कस्टमाइझ करणे
तुम्ही सुसंगत गेम कंट्रोलरशी पेअर किंवा कनेक्ट केल्यानंतर, तुम्ही Apple Arcade आणि App Store मधून सपोर्ट केलेल्या गेमसाठी बटणे कस्टमाइझ करू शकता.
सेटिंग
> सामान्य > ‘गेम कंट्रोलर’ वर जा.
तुम्ही बदलायचे असलेल्या बटणांवर टॅप करा.
विशिष्ट ॲपसाठी कस्टमाइझ करण्यासाठी, ‘ॲप समाविष्ट करा’ वर टॅप करा.
दुसरा गेम कंट्रोलर समाविष्ट करणे आणि फ्रेंडकडून मदत मिळवणे
‘बडी कंट्रोलर’ सह, iPhone मध्ये गेममध्ये एकाच प्लेअरला ड्राइव्ह करण्यासाठी दोन कंट्रोलर एकत्र केले जातात जेणेकरून तुम्हाला पुढच्या स्तरावर नेण्यात फ्रेंड मदत करू शकेल. ‘बडी कंट्रोलर’ गेम कंट्रोलरला सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही गेमशी सुसंगत आहे.
Bluetooth किंवा Lightning किंवा USB-C कनेक्टरद्वारे दोन सुसंगत गेम कंट्रोलर iPhone शी कनेक्ट करा.
सेटिंग
> सामान्य > गेम कंट्रोलर > ‘बडी कंट्रोलर’ वर जा.
प्राथमिक कंट्रोलर निवडा, त्यानंतर दुय्यम कंट्रोलर निवडा.