iPhone वर Safari कस्टमाइझ करण्यासाठी एक्सटेंशन मिळवणे
तुमचा ब्राउझर कशा प्रकारे काम करतो हे कस्टमाइझ करण्यासाठी तुम्ही एक्सटेंशन इंस्टॉल करू शकता. उदाहरणार्थ, एक्सटेंशन तुम्हाला खरेदी करताना कूपन शोधण्यात, संकेतस्थळांवरील कॉण्टेंट ब्लॉक करण्यात, तुम्हाला इतर ॲपच्या फीचरचा ॲक्सेस देण्यात, आणि बऱ्याच गोष्टींसाठी मदत करू शकतात.

Safari एक्सटेंशन समाविष्ट करणे
तुमच्या iPhone वर Safari ॲपवर
जा.
वर टॅप करा, त्यानंतर ‘एक्सटेंशन मॅनेज करा’ वर टॅप करा.
App Store मधील एक्सटेंशनमधून ब्राउझ करण्यासाठी ‘अधिक एक्सटेंशन’ वर टॅप करा.
जेव्हा तुम्हाला हवे असलेले एक्सटेंशन सापडेल, तेव्हा किंमतीवर टॅप करा, किंवा ॲप निःशुल्क असल्यास, ’प्राप्त करा' वर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.
नोट : तुम्ही iPhone वर Safari साठी इंस्टॉल केलेले एक्सटेंशन जे इतर प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहेत ते कोणत्याही iPhone, iPad, किंवा Mac वर Safari सेटिंगमध्ये दिसतील, जिथे तुम्ही त्याच Apple अकाउंट वर साइन इन केलेले असेल, जेणेकरून ते शोधणे आणि डाउनलोड करणे सोपे होईल.
Safari एक्सटेंशन सेटिंग बदलणे
तुमचा ब्राउझर कशा प्रकारे काम करतो हे कस्टमाइझ करण्यासाठी तुम्ही एक्सटेंशन वापरू शकता. तुम्ही कोणत्याही क्षणी Safari एक्सटेंशन चालू किंवा बंद करू शकता.
सेटिंग
> ॲप्स > 'Safari' वर जा.
‘एक्सटेंशन’ वर टॅप करा, त्यानंतर एका एक्सटेंशनवर टॅप करा.
‘एक्सटेंशनला अनुमती द्या’ चालू करा.
तुमच्याकडे Safari प्रोफाइल सेट अप केलेले असल्यास, तुम्हाला ते वापरायचे असलेल्या प्रत्येक प्रोफाइलसाठी एक्सटेंशन चालू करा.
महत्त्वाचे : तुम्ही इन्स्टॉल केलेले एक्सटेंशन तपासा आणि ते काय करतात हे तुम्हाला माहिती असल्याची खात्री करा.
प्रत्येक संकेतस्थळासाठी Safari एक्सटेंशन सेटिंग बदलणे
तुम्ही तुमच्या एकूण Safari सेटिंग न बदलता प्रत्येक संकेतस्थळासाठी एक्सटेंशन चालू किंवा बंद करू शकता.
तुमच्या iPhone वर Safari ॲपवर
जा.
सर्च फील्डच्या डाव्या बाजूला
वर टॅप करा, त्यानंतर ‘एक्सटेंशन मॅनेज करा' वर टॅप करा.
प्रत्येक एक्सटेंशन चालू किंवा बंद करा.
Safari एक्सटेंशन काढून टाकणे
होम स्क्रीनवर खाली स्वाइप करा, त्यानंतर तुम्हाला काढून टाकायचे असलेले एक्सटेंशन शोधा.
एक्सटेंशन आयकॉनवर टच आणि होल्ड करा, “ॲप हटवा" वर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.