iOS 18
iPhone वर ‘व्हॉइस मेमोज’ मध्ये रेकॉर्डिंग अद्ययावत ठेवणे
तुम्ही तुमचे ऑडिओ रेकॉर्डिंग तुमच्या iPhone, iPad किंवा Mac वर ऑटोमॅटिकली अद्ययावत ठेवू शकता, जिथे तुम्ही त्याच Apple अकाउंट मध्ये साइन इन केलेले आहे आणि iCloud सेटिंगमध्ये ‘व्हॉइस मेमोज’ चालू केलेले आहे.
तुमच्या डिव्हाइसवर iCloud मध्ये ‘व्हॉइस मेमोज’ चालू करण्यासाठी, खालील गोष्टी करा :
iOS किंवा iPadOS : सेटिंग
> [तुमचे नाव] > iCloud > ‘सर्व पहा’ वर जा, त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि ‘व्हॉइस मेमोज’ चालू करा.
macOS Sequoia : Apple मेन्यू
> ‘सिस्टीम सेटिंग’ निवडा, नंतर साइडबारमध्ये तुमच्या नावावर क्लिक करा. तुम्हाला तुमचे नाव दिसत नसल्यास, तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करण्यासाठी “साइन इन करा” वर क्लिक करा किंवा अकाउंट तयार करा. iCloud वर क्लिक करा, ‘सर्व पहा’ क्लिक करा, नंतर खाली स्क्रोल करा आणि ‘व्हॉइस मेमोज’ चालू करा.