iPhone वरील ‘रिमाइंडर’ मध्ये तपशील समाविष्ट करणे
तुम्ही तुमच्या रिमाइंडरमध्ये नोट्स, लिंक, देय दिनांक आणि छायाचित्रांसारखे तपशील समाविष्ट करू शकता.
नोट : जेव्हा तुम्ही iCloud मधील अपडेट केलेले रिमाइंडर वापरता तेव्हा ह्या गाइडमध्ये वर्णन केलेले सर्व ‘रिमाइंडर’ फीचर उपलब्ध असतात. इतर अकाउंटचा वापर करताना काही फीचर उपलब्ध नसतात.
रिमाइंडरमध्ये नोट, URL आणि इतर तपशील समाविष्ट करणे
तुमच्या iPhone वरील रिमाइंडर ॲप
वर जा.
आयटमवर टॅप करा.
‘नोट समाविष्ट करा’ वर टॅप करा, नंतर अधिक माहिती समाविष्ट करा.
आयटमचे तपशील संपादित करण्यासाठी
वर टॅप करा. उदाहरणार्थ, तुम्ही दिनांक आणि वेळ सेट करू शकता, स्थानावर आधारित रिमाइंडर सेट करू शकता, एखादा महत्त्वाचा आयटम फ्लॅग करू शकता किंवा छायाचित्र अटॅच करू शकता.
केव्हा आणि कुठे आठवण करून द्यायची ते सेट करणे
तुम्हाला विशिष्ट दिनांकाला, विशिष्ट वेळी किंवा स्थानावर किंवा तुम्ही ‘संदेश’ मध्ये एखाद्या व्यक्तीला संदेश पाठवत असताना आठवण करून दिली जाऊ शकते.
तुमच्या iPhone वरील रिमाइंडर ॲप
वर जा.
आयटमवर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा :
दिनांक आणि वेळ शेड्यूल करा :
वर टॅप करा, त्यानंतर पर्याय निवडा.
टीप : देय दिनांकासह असलेले रिमाइंडर ‘दिनदर्शिका’ मध्ये संपूर्ण दिवसातील इव्हेंट म्हणून दिसतात. ’दिनदर्शिका’ मध्ये ‘रिमाइंडर’ वापरा पहा.
आवर्ती रिमाइंडर सेट करा :
वर टॅप करा, ‘पुन्हा करा’ वर टॅप करा, त्यानंतर वारंवारता निवडा.
शेड्यूल केलेला दिनांक आणि वेळेपूर्वी लवकर रिमाइंडर मिळवा :
वर टॅप करा, ‘लवकरचा रिमाइंडर’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला केव्हा आठवण करुन द्यायची आहे ते निवडा. उदाहरणार्थ, “5 मिनिटे आधी”, “2 दिवस आधी” किंवा इतर पर्याय.
स्थान समाविष्ट करा :
वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला कुठे आठवण करुन द्यायची ते निवडा—उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा किंवा तुमच्या iPhone ला असलेल्या Bluetooth® कनेक्शनसह कारमध्ये बसता तेव्हा.
नोट : ‘स्थान आधारित रिमाइंडर’ प्राप्त करण्याकरिता, तुम्हाला तुमचे अचूक स्थान वापरण्यासाठी ‘रिमाइंडर’ ला अनुमती द्यावी लागेल. सेटिंग
> गोपनीयता व सुरक्षा > ‘स्थान सेवा’ वर जा. ‘स्थान सेवा’ चालू करा, ‘रिमाइंडर’ वर टॅप करा, ‘ॲपचा वापर करताना’ निवडा, त्यानंतर ‘अचूक स्थान’ चालू करा.
‘संदेश’ मध्ये रिमाइंडर प्राप्त करा :
वर टॅप करा, ‘संदेश पाठवताना’ चालू करा, नंतर तुमच्या संपर्क यादीमधून एखादी व्यक्ती निवडा. तुम्ही पुढच्या वेळी जेव्हा त्या व्यक्तीबरोबर ’संदेश’ मध्ये चॅट कराल तेव्हा रिमाइंडर दिसेल.
फ्लॅग आणि प्राधान्य सेट करणे
तुमच्या iPhone वरील रिमाइंडर ॲप
वर जा.
आयटमवर टॅप करा.
पुढीलपैकी कोणतेही एक करा :
महत्त्वाचा आयटम ध्वजांकित करा :
वर टॅप करा.
प्राधान्य सेट करा :
वर टॅप करा, ‘प्राधान्य’ वर टॅप करा, त्यानंतर ‘कमी’, ‘मध्यम’ किंवा ‘उच्च’ निवडा.
छायाचित्र समाविष्ट करणे किंवा डॉक्युमेंट स्कॅन करणे
तुमच्या iPhone वरील रिमाइंडर ॲप
वर जा.
आयटमवर टॅप करा, नंतर
वर टॅप करा.
पुढीलपैकी कोणतेही एक करा :
नवीन छायाचित्र घ्या.
तुमच्या छायाचित्र लायब्ररीमधून छायाचित्र निवडा.
डॉक्युमेंट स्कॅन करा.
स्कॅन करून टेक्स्ट इन्सर्ट करा.