तुमच्या iPhone कॅमेऱ्यासह Live Photos घेणे
तुमच्या iPhone सह Live Photos घेण्यासाठी ‘कॅमेरा’ वापरा. Live Photo तुम्ही छायाचित्र काढण्याच्या अगदी आधी आणि नंतर काय घडते ते ऑडिओसह कॅप्चर करते. तुम्ही सामान्य छायाचित्राप्रमाणेच Live Photo काढता.
Live Photo काढणे
तुमच्या iPhone वर कॅमेरा
उघडा.
कॅमेरा छायाचित्र मोड वर सेट केला गेला असल्याची आणि Live Photo चालू केले गेले असल्याची खात्री करा.
नोट : Live Photo डिफॉल्टनुसार चालू आहे. ते चालू केलेले असताना, तुम्हाला कॅमेरा स्क्रीनच्या शीर्षस्थानी
दिसेल.
Live Photo घेण्यासाठी शटर बटणावर टॅप करा किंवा कॅमेरा कंट्रोल वर क्लिक करा.
Live Photo प्ले करण्यासाठी, स्क्रीनच्या खाली असलेल्या छायाचित्र थंबनेलवर टॅप करा, त्यानंतर स्क्रीनवर टच आणि होल्ड करा.
Live Photos छायाचित्र ॲपमध्ये तुमच्या छायाचित्र लायब्ररीमध्ये ऑटोमॅटिकली जतन केले जातात. Live Photos मध्ये बाउन्स आणि लूपसारखे इफेक्ट समाविष्ट करण्यासाठी, Live Photo मध्ये इफेक्ट समाविष्ट करा पहा.
Live Photos बंद करणे
तुमच्या iPhone वर कॅमेरा
उघडा.
कॅमेरा ’छायाचित्र’ मोड वर सेट केला असल्याची खात्री करा.
कॅमेरा स्क्रीनच्या शीर्षस्थानी
वर टॅप करा जेणेकरून बटणातून स्लॅश दिसेल.
जर तुम्ही आधीच Live Photo घेतला असेल आणि तुम्हाला इफेक्ट बंद करायचा असेल, तर Live Photo संपादित करणे पहा.
नोट : ProRAW किंवा HEIF Max चालू केलेले असताना Live Photos उपलब्ध नसतात. Apple ProRAW छायाचित्रे घ्या पहा.