iPhone वरील Freeform बोर्डवर गणिताची हस्तलिखित उदाहरणे सोडवणे
तुम्ही Freeform बोर्डवर गणिताची हस्तलिखित उदाहरणे सोडवू शकता.
नोट : हस्तलिखित गणिताच्या उदाहरणांची उत्तरे पाहण्यासाठी, तुम्ही iOS 18, iPadOS 18 किंवा नंतरच्या व्हर्जनचा वापर केला पाहिजे.
तुमच्या iPhone वरील
Freeform ॲपवर जा.
बोर्ड उघडा किंवा नवीन बोर्ड सुरू करण्यासाठी
वर टॅप करा.
वर टॅप करा, ‘गणितीय परिणाम’ वर टॅप करा, त्यानंतर तुमच्या iPhone ने तुम्ही प्रविष्ट केलेल्या गणिताच्या उदाहरणांना कसा प्रतिसाद द्यावा हे निवडा :
जर तुम्हाला ते सोडवायचे असेल तर : ‘परिणाम इन्सर्ट करा’ निवडा. (तुमच्या उत्तराशी जुळणारे लिखित स्वरूपातील उत्तर दिसते.)
तुम्हाला सूचना दिसाव्यात असे वाटत असल्यास : ‘परिणाम सुचवा’ निवडा. (एक सोडवा बटण दिसते, ते टॅप केल्यावर, तुमचे स्वतःच्या उत्तराशी जुळणारे लेखी उत्तर समाविष्ट केले जाते.)
वर टॅप करा, त्यानंतर गणिताचे समीकरण लिहायला सुरूवात करा.
बरोबरचे चिन्ह लिहा किंवा संख्यांचा संचाच्या खाली आडवी रेषा काढा, नंतर संख्यांचा संच एक करा :
‘परिणाम इन्सर्ट करा’ मोडमध्ये : समीकरण उघडण्यासाठी उत्तरावर टॅप करा. उत्तर हटवण्यासाठी तुम्ही
वर टॅप करू शकता.
‘परिणाम सुचवा’ मोडमध्ये : तुमच्या उत्तराशी जुळणारे लेखी उत्तर समाविष्ट करण्यासाठी ’सोडवा’ वर टॅप करा.
तुम्हाला कोणता मोड हवा आहे हे तुम्ही ठरवू शकता किंवा गणिताच्या सूचनिका बंद करू शकता. गणिताच्या सूचनिका मिळवा पहा.
तुम्ही कोणत्याही स्टिकी नोट्स, आकार आणि टेक्स्ट बॉक्स मधील टेक्स्टमध्ये आणि नोट्स ॲपमध्ये सोडवायची समीकरणे देखील टाइप करू शकता.
तुम्ही कॅल्क्युलेटर ॲपमध्ये चल देखील वापरू शकता, समीकरणे संपादित करू शकता आणि परिणाम अपडेट करू शकता. गणितीय नोट्ससह गणित सोडवा पहा.