iPhone वरील संकेतस्थळ किंवा ॲपचा पासवर्ड बदलणे
तुम्ही तुमच्या iPhone वरील संकेतस्थळ किंवा ॲपवर साइन इन करण्यासाठी वापरत असलेला पासवर्ड बदलू शकता.

तुमच्या iPhone वरील पासवर्ड ॲपवर
जा.
‘सर्व’ वर टॅप करा, त्यानंतर संकेतस्थळ किंवा ॲपसाठी अकाउंट शोधा.
अकाउंटवर टॅप करा.
‘संपादित करा’ वर टॅप करा, ‘पासवर्ड बदला’ वर टॅप करा, नंतर संकेतस्थळावर किंवा ॲपमध्ये तुमचा पासवर्ड बदला.
संकेतस्थळ किंवा ॲप तुम्हाला Apple सह साइन इन करण्यासाठी अपग्रेड करण्याची अनुमती देत असल्यास, तुम्ही त्या फीचरच्या सुरक्षा आणि सुविधेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही तुमचा पासवर्ड बदलत असताना तुम्हाला अपग्रेड करण्याचा पर्याय दिला गेला नसेल, तर अनेक अकाउंट iPhone ला ऑटोमॅटिकली एक प्रबळ पासवर्ड तयार करण्याची अनुमती देतात, जो तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही.
नोट : जर iPhone ने तुम्हाला ह्यापुढे उपलब्ध नसलेल्या संकेतस्थळ किंवा ॲपच्या पासवर्डबद्दल चेतावणी दिली असेल, तर तुम्ही तुमचे iPhone आणि iCloud कीचेनमधून त्याचे अकाउंट काढून टाकू शकता. तुमच्या iPhone वरील पासवर्ड ॲपवर जा, ’सर्व’ वर टॅप करा, नंतर अकाउंटवर डावीकडे स्वाइप करा.