तुमचा वैद्यकीय ID सेट अप करणे आणि बघणे
वैद्यकीय ID तुम्हाला ॲलर्जी, वैद्यकीय स्थिती आणि तुमचे आपत्कालीन संपर्क ह्यासारखी माहिती प्रदान करते जी आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाची असू शकते. तुमचा iPhone आणि Apple Watch आपत्कालीन कॉल (फक्त यू. एस. आणि कॅनडा) दरम्यान तुमचा वैद्यकीय ID ऑटोमॅटिकली आणि प्रथम प्रतिसादकर्त्यांना प्रत्यक्ष शेअर करू शकतात.
तुमचा वैद्यकीय ID तयार करणे
आरोग्य ॲपमध्ये मेडिकल ID सेट अप करा.
तुमच्या iPhone वर आरोग्य ॲपवर
जा.
वरच्या उजव्या बाजूला तुमच्या चित्रावर टॅप करा, नंतर वैद्यकीय ID वर टॅप करा.
‘प्रारंभ करा’ किंवा ‘संपादित करा’ वर टॅप करा, नंतर तुमची माहिती प्रविष्ट करा.
‘आपत्कालीन संपर्क’ च्या खाली, ‘आपत्कालीन संपर्क समाविष्ट करा’ वर टॅप करा, नंतर तुमचे संपर्क समाविष्ट करा.
आपत्कालीन कॉल समाप्त झाल्यानंतर, जोपर्यंत तुम्ही रद्द करणे निवडत नाही तोपर्यंत तुमचा iPhone तुमच्या आपत्कालीन संपर्कांना टेक्स्ट संदेशाद्वारे अलर्ट्स करतो. तुमचा iPhone तुमचे सध्याचे स्थान पाठवतो (उपलब्ध असल्यास) आणि—तुम्ही SOS मोड प्रविष्ट केल्यानंतर काही कालावधीसाठी—तुमचे स्थान बदलल्यावर तुमच्या आपत्कालीन संपर्कांना अपडेट प्राप्त होतात.
‘पूर्ण’ वर टॅप करा.
टीप : होम स्क्रीनवरून तुमचा वैद्यकीय ID बघण्यासाठी, आरोग्य ॲप आयकॉनवर टच आणि होल्ड करा, नंतर वैद्यकीय ID निवडा.
आपत्कालीन सेवा आणि पहिल्या प्रतिसादकर्त्यांना तुमचा वैद्यकीय ID ॲक्सेस करण्याची अनुमती देणे
तुमच्या वैद्यकीय ID मधील माहिती आपत्कालीन कॉलच्या वेळी (केवळ यू. एस. आणि कॅनडामध्ये) ऑटोमॅटिकली शेअर केली जाऊ शकते आणि तुमच्या iPhone आणि Apple Watch च्या लॉक स्क्रीनवर देखील दिसते.
तुमच्या iPhone वर आरोग्य ॲपवर
जा.
वरच्या उजव्या बाजूला तुमच्या चित्रावर टॅप करा, नंतर वैद्यकीय ID वर टॅप करा.
’संपादित करा’ वर टॅप करा, तळाशी स्क्रोल करा, नंतर ’लॉक झाल्यावर दाखवा’ आणि ‘आपत्कालीन कॉल’ चालू करा.
नोट : पहिला प्रतिसादकर्ता तुमचा वैद्यकीय ID स्वाइप करून किंवा होम बटण दाबून (तुमच्या iPhone मॉडेलनुसार), पासकोड स्क्रीनवर ‘आपत्कालीन स्थिती’ वर टॅप करून, नंतर ‘वैद्यकीय ID ‘वर टॅप करून लॉक स्क्रीनवरून बघतो.