iPhone वर FaceTime ने सुरुवात करणे
Wi-Fi किंवा मोबाइल सेवा वापरून फ्रेंड्स आणि कुटुंबियांना फेस-टू-फेस भेटण्यासाठी FaceTime ॲप कसे वापरावे, ते जाणून घ्या. FaceTime कॉलमध्ये, तुम्ही TV शो आणि मूव्ही देखील पाहू शकता, संगीत ऐकू शकता आणि एकत्र वर्क आउट देखील करू शकता.

FaceTime सेट अप करणे
FaceTime वापरणे सुरू करण्यासाठी, सेटिंग > ॲप > FaceTime वर जा, त्यानंतर तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करा किंवा FaceTime चालू करा. जर एक किंवा अधिक संपर्क पद्धती “तुमच्याशी यावर FaceTime मार्फत संपर्क साधता येऊ शकतो” अंतर्गत दिसत असतील, तर तुम्ही ते सिलेक्ट किंवा डीसिलेक्ट करण्यासाठी टॅप करू शकता.

FaceTime कॉल करणे
FaceTime ॲप उघडा, ‘नवीन FaceTime’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला (किंवा लोकांना) कॉल करायचा आहे, तिचे नाव किंवा फोन नंबर प्रविष्ट करा. व्हिडिओ कॉल करण्यासाठी वर किंवा ऑडिओ कॉल करण्यासाठी
वर टॅप करा (सर्व देश किंवा प्रदेशांमध्ये उपलब्ध नाही). तुम्ही कॉलवर जास्तीत जास्त 32 लोकांशी बोलू शकता.
ज्यांच्याकडे Apple डिव्हाइस नाही, अशा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला कॉल करायचा असल्यास, तुम्ही ‘संदेश’ किंवा ‘Mail’ ॲपमध्ये कॉल करण्यासाठी लिंक तयार करू शकता आणि पाठवू शकता. सुरुवात करण्यासाठी, FaceTime उघडा, त्यानंतर ‘लिंक तयार करा’ वर टॅप करा.

FaceTime कंट्रोल वापरणे
FaceTime कॉल सुरू असताना, तुमचा स्पीकर, कॅमेरा किंवा माइक चालू किंवा बंद करण्यासाठी, तसेच Live Photo टिपण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी FaceTime कंट्रोलचा वापर करा. तुम्हाला कंट्रोल दिसत नसल्यास, तुमच्या स्क्रीनवर टॅप करा.

पाहणे, ऐकणे आणि एकत्र प्ले करणे
संगीत किंवा व्हिडिओ एकत्र शेअर करणे किंवा FaceTime कॉल सुरू असताना एकत्र वर्कआउट करणे चालू करण्यासाठी, FaceTime कंट्रोलमध्ये वर टॅप करा (तुम्हाला
दिसत नसल्यास, स्क्रीनवर टॅप करा).
खालील ॲपमधून स्क्रोल करा आणि ‘एकत्रितपणे ऐका आणि प्ले करा, नंतर पुढीलपैकी एक सिलेक्ट करा (उदाहरणार्थ, Apple TV ॲप, ‘संगीत’ किंवा ‘फिटनेस’).
अधिक जाणून घ्यायचे आहे का?
नोट : सर्व फीचर आणि कॉण्टेंट सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाहीत.