तुमच्या आवडत्या टीम्स आणि लीग्ज सेट अप करणे

तुम्ही Apple Sports ॲप इन्स्टॉल केल्यावर, तुम्हाला तुमच्या आवडत्या टीम्स किंवा लीग्ज निवडून माझे खेळ मध्ये सेट अप आणि सिंक करण्यासाठी सूचित केले जाते.
जर तुम्ही News ॲप
किंवा Apple TV ॲप
मध्ये ‘माझे खेळ’ आधीच सेट अप केले असेल आणि त्याच Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले असेल, तर तुमच्या टीम्स किंवा लीग्ज Apple Sports ॲपसह ऑटोमॅटिकली सिंक केले जातात आणि तुम्ही ते उघडल्यावर दिसतात.
Apple Sports ॲपमध्ये तुमच्या आवडत्या टीम्स आणि लीग्ज सेट अप करणे
तुमच्या iPhone वर Apple Sports ॲप
वर जा, नंतर ‘सुरुवात करा’ वर टॅप करा.पुढीलपैकी कोणतेही एक करा :
सर्च वापरा : सर्च फील्डवर टॅप करा, सर्च करण्यासाठी शब्द प्रविष्ट करा किंवा डिक्टेट करा, नंतर तुम्हाला फॉलो करायच्या असलेल्या टीम किंवा लीगच्या पुढील
वर टॅप करा.लीग सिलेक्ट करा : आजचे स्कोअर्स पाहण्यासाठी लीगवर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला फॉलो करायच्या असलेल्या लीगच्या पुढील
वर टॅप करा.टीम सिलेक्ट करा : लीगवर टॅप करा, नंतर तुम्हाला फॉलो करायच्या असलेल्या टीमच्या पुढील
वर टॅप करा.
तुमचे काम झाल्यावर, ’पूर्ण’ वर टॅप करा.
Apple Sports ॲपमध्ये नंतर बदल करण्यासाठी, वरच्या उजव्या कोपऱ्यातील मेन्यू बटणावर टॅप करा, नंतर ‘संपादित करा’ वर टॅप करा (Apple Sports ॲपमध्ये ‘माझे खेळ’ मॅनेज करणे पहा).
जेव्हा तुम्ही आवडीचे विषय समाविष्ट करता किंवा काढून टाकता, तेव्हा ते News, Apple TV आणि इतर सपोर्टेड ॲप्समध्ये आणि iPad, Mac आणि Apple TV ह्यासारख्या त्याच Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेल्या इतर डिव्हाइसेसमध्ये माझे खेळ मध्ये सिंक केले जातात.
News ॲप किंवा Apple TV ॲपमध्ये तुमच्या आवडत्या टीम्स आणि लीग्ज सेट अप करणे
जर तुम्ही News ॲप
किंवा Apple TV ॲप
मध्ये माझे स्पोर्ट्स सेट अप आणि मॅनेज केले, तर तुमच्या आवडत्या टीम्स किंवा लीग्ज Apple Sports ॲप
मध्ये देखील दिसतात.
पुढीलपैकी कोणतेही एक करा :
News ॲपमध्ये ‘माझे खेळ’ सेट अप करा : iPhone यूझर गाइड मध्ये News ॲपसाठीच्या सूचनांचे पालन करा.
Apple TV ॲपमध्ये ‘माझे खेळ’ सेट अप करा : iPhone यूझर गाइड मध्ये Apple TV ॲपसाठीच्या सूचनांचे पालन करा.
Apple Sports ॲपमध्ये नंतर बदल करण्यासाठी, वरच्या उजव्या कोपऱ्यातील मेन्यू बटणावर टॅप करा, नंतर ‘संपादित करा’ वर टॅप करा. Apple Sports ॲपमध्ये ‘माझे खेळ’ मॅनेज करणे पहा.