रिअल टाइम आकडेवारीसह गेम फॉलो करणे

स्कोअर स्क्रीनवर आजचे गेम बघताना, तुम्हाला सध्या चालू असलेल्या सर्व गेमचा आढावा दिसेल, ज्यामध्ये स्कोअर आणि गेम क्लॉक प्रत्येक क्षणाचा मागोवा घेतील आणि रिअल टाइममध्ये आकडेवारी अपडेट करतील.
जेव्हा तुम्ही ‘लाइव्ह ॲक्टिव्हिटी’ चालू करता, तेव्हा तुम्ही तुमच्या iPhone लॉक स्क्रीनवर किंवा तुमच्या Apple Watch वर रिअल टाइम माहिती मिळवू शकता, जेणेकरून तुम्ही फक्त एका दृष्टिक्षेपात गेमचे प्रत्येक क्षण फॉलो करू शकता (iOS 18 किंवा नंतरचे व्हर्जन आणि watchOS 11 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक).
गेमच्या दरम्यान तपशीलवार माहिती मिळवणे
तुमच्या iPhone वरील Apple Sports ॲपवर
जा.चालू असलेल्या गेम्समध्ये मध्यभागी असलेल्या कॉलममध्ये लाइव्ह स्टेटस अपडेट्स दाखवतात.
कोणते गेम्स दिसतील हे फिल्टर करण्यासाठी, Apple Sports ॲपमध्ये शेड्यूल्स आणि स्कोअर्स बघणे पहा.
अधिक तपशीलांसाठी गेमवर टॅप करा.
गेम कार्ड स्क्रीनवर, पुढीलपैकी कोणतेही करा :
बेटिंग ऑड्ससह (जेथे उपलब्ध असेल) रिअल टाइम आकडेवारी बघा : आकडेवारी पाहण्यासाठी स्क्रोल करा किंवा गेमवर अधिक तपशील पाहण्यासाठी आकडेवारी टॅबवर टॅप करा.
नोट : खेळ आणि लीगवर अवलंबून विविध आकडेवारी दिसतात.
चालू असलेल्या दुसऱ्या गेमवर जा : लाइव्ह शेड्यूलवर दुसरे गेम कार्ड बघण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा.
गेम बघा : जर उपलब्ध असेल, तर ब्रॉडकास्ट बघण्याचे पर्याय गेम कार्डवर दिसतात. Apple TV ॲप उघडण्यासाठी आणि पर्याय निवडण्यासाठी, ‘Apple TV मध्ये उघडा’ वर टॅप करा.
नोट : जर तुम्ही त्याच Apple अकाउंट मध्ये साइन इन केले असेल आणि तुम्ही Apple TV ची सदस्यता घेतली असेल तर Apple TV ॲपमध्ये फ्रायडे नाइट बेसबॉल गेम्स आणि MLS सामने लगेच खेळण्यास सुरुवात होते. इतर सर्व गेम्स Apple TV ॲपमध्ये पाहण्याच्या पर्यायांची यादी उघडतात.
गेम कार्ड स्क्रीनवरून स्कोअर्सवर परत जाण्यासाठी खाली स्वाइप करा.
गेम शेअर करणे
तुम्ही आगामी, लाइव्ह किंवा अंतिम गेम शेअर करू शकता जेणेकरून तुमचे फ्रेंड्स iPhone वरील Apple Sports ॲपमध्ये फॉलो करू शकतील.
आजचे गेम्स पाहण्यासाठी तुमच्या iPhone वर Apple Sports ॲप
वर जा.नोट : ॲपमध्ये कोणते गेम्स दिसतात हे सेट करण्यासाठी, Apple Sports ॲपमध्ये शेड्यूल्स आणि स्कोअर्स बघणे पहा.
अधिक तपशीलांसाठी गेमवर टॅप करा.
गेम कार्ड स्क्रीनवर,
वर टॅप करा, त्यानंतर संदेश किंवा Mail ह्यासारखे शेअरिंग पर्याय निवडा.
जर प्राप्तकर्त्याकडे Apple Sports नसेल, तर त्यांना आधी ॲप डाउनलोड करण्यासाठी सूचित केले जाईल.
आजच्या गेमसाठी लाइव्ह ॲक्टिव्हिटी चालू करणे
तुमच्या iPhone लॉक स्क्रीन किंवा Apple Watch वर रिअल टाइम गेम अलर्ट्स मिळवण्यासाठी ‘लाइव्ह ॲक्टिव्हिटीज’ चालू करा (iOS 18 किंवा नंतरचे व्हर्जन किंवा watchOS 11 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक आहे).
आजचे गेम्स पाहण्यासाठी तुमच्या iPhone वर Apple Sports ॲप
वर जा.जर गेम अजून सुरू झाला नसेल, तरीही तुम्ही त्याच्यासाठी ‘लाइव्ह ॲक्टिव्हिटी’ शेड्यूल करू शकता.
नोट : ॲपमध्ये कोणते गेम्स दिसतात हे सेट करण्यासाठी, Apple Sports ॲपमध्ये शेड्यूल्स आणि स्कोअर्स बघणे पहा.
अधिक तपशीलांसाठी गेमवर टॅप करा.
गेम कार्ड स्क्रीनवर,
वर टॅप करा, नंतर स्कोअरवर परत जाण्यासाठी गेम कार्डवरून खाली स्वाइप करा.तुमच्या iPhone लॉक स्क्रीनवर किंवा तुमच्या Apple Watch वर, रिअल टाइम अपडेट्स, स्कोअर्स आणि खेळांसह गेम दरम्यान अलर्ट्स दिसतात.

iPhone वर Apple Sports ॲपमधील गेम कार्ड स्क्रीनवर परत जाण्यासाठी, iPhone लॉक स्क्रीनवरील ‘लाइव्ह ॲक्टिव्हिटीज’ अलर्टवर टॅप करा.
गेम दरम्यान लाइव्ह ॲक्टिव्हिटीज अलर्टस थांबवण्यासाठी, पुढीलपैकी कोणतेही एक करा :
iPhone च्या लॉक स्क्रीनवर, लाइव्ह ॲक्टिव्हिटीज अलर्टवर डावीकडे स्वाइप करा.
Apple Sports ॲपमधील गेम कार्ड स्क्रीनवर,
वर टॅप करा.
तुम्ही ऑटोमॅटिकली फॉलो करत असलेल्या कोणत्या टीम्ससाठी लाइव्ह ॲक्टिव्हिटीज चालू असावी किंवा तुम्हाला किती वारंवार गेम अपडेट्स मिळतात हे सेट करण्यासाठी, लाइव्ह ॲक्टिव्हिटीज मॅनेज करा मधील सूचनांचे पालन करा.