पायरी 1: तुमच्या अपत्याशी स्क्रीन टाइमबद्दल संभाषण करा
तुम्ही American Academy of Pediatrics (AAP) कडून स्क्रीन टाइम मार्गदर्शन रिव्ह्यू केल्यानंतर आणि तुमच्या कुटुंबासाठी काय योग्य आहे ह्याचा विचार केल्यानंतर, पुढील पायरी म्हणजे तुमच्या अपत्याशी बोलणे. एक-वेळेचा नियम म्हणून नाही, तर ही संभाषणे त्यांच्याबरोबर वाढत जाणारा सततचा संवाद म्हणून अधिक चांगले काम करतात.
तुमच्या अपत्यासोबत संभाषण सुरू करा
लहान मुलांसाठी, एकत्र बघा आणि खेळा जेणेकरून तुम्हाला त्यांचा दृष्टिकोन समजेल आणि साधे, दोघांसाठी असलेले करार ठरवा. ह्यामध्ये जेवणासारख्या आणि झोपण्यापूर्वीच्या तासासारख्या स्क्रीन-मुक्त वेळा आणि बेडरूमसारखी स्क्रीन-मुक्त क्षेत्रे समाविष्ट असू शकतात. तुम्ही सेट केलेल्या मर्यादांमागील कारणे स्पष्ट करा. वाढत्या शरीरासाठी आणि मनासाठी झोप, हालचाल आणि ऑफलाइन खेळ महत्त्वाचे आहेत. आणि तुम्ही चर्चा केलेल्या मर्यादांना मदत करण्यासाठी त्यांच्या Apple डिव्हाइसवर स्क्रीन टाइम सेटिंग ॲडजस्ट करू शकता.
तुमचे अपत्य मोठे होत असताना, तुम्हाला कदाचित त्यांच्यासाठी स्क्रीन टाइम व्यवस्थापित करण्याऐवजी त्यांना स्वतः तो व्यवस्थापित करण्यास मदत करायची असेल—जेणेकरून ते प्रौढ होईपर्यंत त्यांनी आधीच निरोगी सवयी लावून घेतल्या असतील. ते डिव्हाइस किती वेळ वापरत आहेत ह्याऐवजी ते प्रत्यक्षात काय करत आहेत ह्यावर संभाषण होऊ द्या. आरोप करण्याऐवजी जिज्ञासू रहा.
त्याच्या संकेतस्थळावर, AAP संभाषण सुरू करण्यासाठी काही पर्याय देते जे तुम्ही वापरू शकता, जसे की :
‘आपण आपल्या कुटुंबाने तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मर्यादा कशा ठरवाव्यात ह्याबद्दल चर्चा करू शकतो का? ‘ह्यावर आपण एकत्र काम करू या कारण मला तुम्हाला ह्या निर्णयांमध्ये समाविष्ट करायचे आहे.’
‘दिवसाच्या अशा काही वेळा आहेत का, ज्यावेळी आपण डिव्हाइस किंवा फोन वापरू नये असे तुम्हाला वाटते? ‘एक उदाहरण रात्रीच्या कौटुंबिक जेवणाच्या वेळी असू शकते.’
‘मी डिव्हाइस किंवा फोनवर नव्हे, तर प्रत्यक्ष उपस्थित असावे असे तुमच्यासाठी महत्त्वाचे काही क्षण आहेत का?’
अतिरिक्त सूचनांसाठी, AAP च्या कुटुंबासाठी मीडियाबद्दल संभाषण सुरू करणाऱ्या गोष्टी पहा.
तुमच्या अपत्याला डिजिटल साक्षरता निर्माण करण्यात मदत करा
तुम्ही तुमच्या अपत्याशी स्क्रीन टाइमबद्दल बोलता, तेव्हा तुम्ही त्यांना डिजिटल साक्षरता विकसित करणे, म्हणजेच तंत्रज्ञान सुरक्षितपणे आणि विचारपूर्वक कसे वापरावे हे जाणून घेणे, ह्यासाठी मदत करू शकता. तुम्ही तुमच्या अपत्याला काय शेअर करायचे, कोणावर विश्वास ठेवायचा आणि ऑनलाइन लोकांशी कसे वागायचे हे समजून घेण्यात मदत करू शकता. तुम्ही तुम्हाला आढळणाऱ्या चुकीच्या माहितीची उदाहरणे दाखवू शकता, इन्फ्लुएंसर आणि जाहिराती काय विकत आहेत ह्यावर प्रश्न विचारू शकता आणि वापरणे थांबवणे कठीण असलेल्या ॲपबद्दल बोलू शकता. संभाषण दुतर्फी ठेवल्याने सायबरबुलिंग आणि गोपनीयता ह्यांसारख्या कठीण विषयांवर बोलण्याची संधी मिळते, जेणेकरून तुमच्या अपत्याला कळेल की ते कोणत्याही गोष्टींबद्दल तुमच्याकडे येऊ शकतात.
अधिक माहितीसाठी, डिजिटल विश्वात प्रगती करण्यासाठी मुलांना मदत करणे : AAP कडून AAP च्या धोरणाचे स्पष्टीकरण पहा.