तुमच्या अपत्याच्या डिव्हाइसवर चित्रपट, संगीत आणि अधिकसाठी वयानुसार योग्य कॉण्टेण्ट निवडा
तुम्ही ॲप, संगीत, पुस्तके, चित्रपट, टीव्ही शो आणि बरेच काही- उदाहरणार्थ Apple ॲप जसे की पुस्तक ॲप किंवा संगीत ॲप
मध्ये वयानुसार योग्य रेटिंग निवडू शकता, जेणेकरून तुमचे अपत्य त्यांच्या वयाला योग्य असा कॉण्टेण्ट पाहू शकेल. ह्यांपैकी अनेक रेटिंग तुमच्या अपत्याच्या वयावर आधारित ऑटोमॅटिकली लागू केली जातात आणि कधीही ॲडजस्ट केली जाऊ शकतात.
चित्रपट, संगीत, टीव्ही शो आणि बरेच काहीमध्ये वयानुसार योग्य कॉण्टेण्ट निवडा
तुमच्या अपत्याची सेटिंग उघडा :
iPhone किंवा iPad वर : ‘सेटिंग’ ॲपवर जा, ‘कुटुंब’ वर टॅप करा, त्यानंतर तुमच्या अपत्याच्या नावावर टॅप करा.
Mac वर : ‘सिस्टीम सेटिंग’ वर जा, ‘कुटुंब’ वर क्लिक करा, नंतर तुमच्या अपत्याच्या नावावर क्लिक करा.
‘कॉण्टेण्ट व गोपनीयता निर्बंध’ वर टॅप किंवा क्लिक करा, नंतर कॉण्टेण्ट निर्बंध अंतर्गत दाखवल्या गेलेल्या सेटिंगपैकी कोणत्याही सेटिंगला, जसे की पुस्तके, चित्रपट, टीव्ही शो आणि संगीतला अनुमती द्या किंवा ब्लॉक करा.
पुढे काय?
तुम्ही ॲप आणि संकेतस्थळे ब्लॉकदेखील करू शकता आणि तुमच्या अपत्याच्या डिव्हाइसवरील बिल्ट-इन ॲप आणि फीचर बंद करू शकता, जसे की कॅमेरा, AirDrop आणि CarPlay. तुमच्या अपत्याच्या डिव्हाइसवरील ॲप आणि संकेतस्थळांचा ॲक्सेस ब्लॉक करणे किंवा अनुमती देणे आणि Siri आणि Apple Intelligence फीचरचा ॲक्सेस ब्लॉक करणे किंवा अनुमती देणे पहा.