तुमच्या अपत्याच्या Apple Watch वर ‘शाळेची वेळ’ सह सुरुवात करणे
शाळेची वेळ तुम्ही निवडलेल्या दिवसांमध्ये आणि वेळेत, जसे की शाळेच्या वेळेत, तुमच्या अपत्याच्या Apple Watch वर नोटिफिकेशन आणि ॲपचा वापर ब्लॉक करते. जेव्हा ते सक्रिय असते, तेव्हा त्यांच्या वॉच फेसवर पिवळे वर्तुळ दिसते आणि ‘डू नॉट डिस्टर्ब’ चालू होते. संदेश तपासण्यासाठी किंवा आपत्कालीन सेवांना कॉल करण्यासाठी तुमचे अपत्य ‘शाळेची वेळ’ मधून तात्पुरते बाहेर पडू शकते आणि जेव्हा ते असे करतात तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळते. जेव्हा तुमचे अपत्य मनगट खाली करते, तेव्हा ‘शाळेची वेळ’ पुन्हा चालू होते.
नोट : ‘तुमच्या मुलांसाठी Apple Watch’ सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही. सपोर्ट केलेल्या नेटवर्क प्रोव्हायडरसह उपलब्धतेबद्दलच्या माहितीसाठी, Apple Watch GPS + Cellular पहा.
तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी
कुटुंबातील सदस्याच्या Apple Watch वर ‘शाळेची वेळ’ शेड्यूल वापरण्यासाठी, प्रथम तुमच्या अपत्यासाठी Apple Watch सेट अप करा. ह्यासाठी watchOS 7 किंवा नंतरच्या व्हर्जनसह ह्यापैकी एक Apple Watch मॉडेल आवश्यक आहे :
मोबाइल सेवेसह Apple Watch Series 6 किंवा त्यानंतरचे व्हर्जन
मोबाइल सेवेसह Apple Watch SE (पहिले जनरेशन) किंवा त्यानंतरचे व्हर्जन
Apple Watch Ultra, Apple Watch Ultra 2 किंवा त्यानंतरचे व्हर्जन
वॉचच्या सुरुवातीच्या सेटअपसाठी तुम्हाला iOS 14 किंवा त्यानंतरचे व्हर्जन असलेल्या iPhone 6s किंवा त्यानंतरच्या मॉडेलचीदेखील गरज आहे. तुमच्या स्वतःच्या Apple Watch वर ‘शाळेची वेळ’ वापरण्यासाठी, तुम्हाला watchOS 7 किंवा त्यानंतरच्या व्हर्जनची आवश्यकता आहे.
नोट : कुटुंबातील सदस्यासाठी Apple Watch सेट अप करण्यासाठी मोबाइल प्लॅन आवश्यक नाही, परंतु काही फीचरसाठी आवश्यक आहे.
शाळेची वेळ सेट अप करणे
वॉच व्यवस्थापित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या iPhone वर Apple Watch
ॲपवर जा.
‘माझे वॉच’ वर टॅप करा, नंतर ‘फॅमिली वॉच’ च्या खाली असलेल्या वॉचवर टॅप करा.
वर टॅप करा, त्यानंतर ‘शाळेची वेळ’ वर टॅप करा.
‘शाळेची वेळ’ चालू करा, त्यानंतर ‘शेड्यूल संपादित करा’ वर टॅप करा.
तुम्हाला वॉचवर शाळेची वेळ सक्रिय ठेवायची असलेले दिवस आणि वेळ निवडा.
नोट : अनेक दिवसांसाठी शेड्यूल सेट करण्यासाठी, ’दिवस कस्टमाइझ करा’ वर टॅप करा.
जर तुम्हाला एका दिवसात अनेक शेड्यूल सेट करायचे असतील, तर ‘वेळ समाविष्ट करा’ वर टॅप करा.
‘शाळेची वेळ’ मधून बाहेर पडणे
तुमचे अपत्य ‘शाळेची वेळ’ मधून तात्पुरते बाहेर पडू शकते.
डिस्प्लेवर टॅप करा, नंतर Digital Crown दाबा आणि होल्ड करा.
‘बाहेर पडा’ वर टॅप करा.
तुमचे अपत्य निर्धारित वेळेत ‘शाळेची वेळ’ मधून बाहेर पडल्यास, त्यांनी मनगट खाली केल्यावर शाळेच्या वेळेचा वॉच फेस परत येतो. शेड्यूल न केलेल्या तासांमध्ये, पुढील शेड्यूल केलेल्या सुरू होण्याच्या वेळेपर्यंत किंवा तुमच्या अपत्याने कंट्रोल सेंटरमध्ये ‘शाळेची वेळ’ वर टॅप करेपर्यंत ‘शाळेची वेळ’ निष्क्रिय राहते.
‘शाळेची वेळ’ कधी अनलॉक केले गेले होते ते पाहणे
वॉच व्यवस्थापित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या iPhone वर Apple Watch
ॲपवर जा.
‘माझे वॉच’ वर टॅप करा, नंतर ‘फॅमिली वॉच’ च्या खाली असलेल्या वॉचवर टॅप करा.
वर टॅप करा, नंतर ‘शाळेची वेळ’ अनलॉक केले गेले होते त्या दिवस, वेळ आणि कालावधीसाठी रिपोर्ट पाहण्यासाठी ‘शाळेची वेळ’ वर टॅप करा.
Apple Watch वर देखील अहवाल दिसतो. ते पाहण्यासाठी, Apple Watch वर सेटिंग ॲप
वर जा, नंतर ‘शाळेची वेळ’ वर टॅप करा.
डिस्प्ले स्लीप मोडमध्ये गेल्यानंतर ‘शाळेची वेळ’ पुन्हा चालू होते.
टीप : जेव्हा ‘शाळेची वेळ’ सक्रिय नसते—उदाहरणार्थ, जर त्यांनी शाळेनंतरच्या अभ्यास गटात भाग घेतला असेल जो निर्धारित वेळेपेक्षा जास्त आहे आणि त्यांना विचलित व्हायचे नसेल, तेव्हा तुमचे अपत्य ते चालू करू शकते. फक्त साइड बटण दाबा, नंतर कंट्रोल सेंटरमध्ये वर टॅप करा. ‘शाळेची वेळ’ मधून बाहेर पडण्यासाठी, Digital Crown दाबा आणि होल्ड करा, नंतर ‘बाहेर पडा’ वर टॅप करा.
पुढे काय?
जर तुमच्या कौटुंबिक शेअरिंग गटाकडे Apple Music फॅमिली सदस्यता असेल, तर तुमच्या अपत्याकडे Wi-Fi किंवा मोबाइल डेटा कनेक्शन असेपर्यंत ते Apple Music ऐकू शकते. ते पॉडकास्ट फॉलो आणि स्ट्रीमदेखील करू शकतात. सुरू करण्यासाठी, तुमच्या अपत्याच्या Apple Watch वर ‘संगीत’ किंवा ‘पॉडकास्ट’ ॲप
उघडा.