Siri ला सांगा
नोट : Siri वापरण्यासाठी तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट असणे आवश्यक आहे.
तुम्ही Siri ला काहीतरी करण्यास सांगण्यापूर्वी, तुम्ही ते सक्रिय करणे आवश्यक आहे. तुमच्या iPhone वर, पुढीलपैकी कोणतेही एक करा :
तुमच्या व्हॉइससह : ’Siri’ किंवा ‘Hey Siri.’ म्हणा
Face ID सह iPhone वर : साइड बटण दाबा आणि होल्ड करा.
होम बटणासह iPhone वर : होम बटण दाबा आणि होल्ड करा.
EarPods सह : मधले किंवा ‘कॉल करा’ बटण दाबा आणि होल्ड करा.
CarPlay सह : स्टिअरिंग व्हीलवरील ‘व्हॉइस कमांड’ बटण दाबा आणि होल्ड करा, किंवा ‘CarPlay होम स्क्रीन’ वरील होम बटणावर टच आणि होल्ड करा.
Siri Eyes Free सह : तुमच्या स्टीअरिंग व्हीलवरील ‘व्हॉइस कमांड’ बटण दाबा आणि होल्ड करा.