‘फोन’ ॲप लेआउट बदलणे

तुम्ही तुमचे आवडते, अलीकडील आणि व्हॉइसमेल्स एकाच टॅबमध्ये एकत्रित करणारा ‘युनिफाइड’ लेआउट वापरणे निवडू शकता किंवा त्यांना वेगळ्या टॅबमध्ये क्रमवार लावण्यासाठी ‘क्लासिक’ लेआउट निवडू शकता.

  1. तुमच्या iPhone वर ‘फोन’ ॲपवर जा.

  2. तुमच्या स्क्रीनच्या तळाशी ‘कॉल्स’ (युनिफाइड लेआउटमध्ये) किंवा ’अलीकडील’ (क्लासिक लेआउटमध्ये) वर टॅप करा.

  3. फिल्टर बटण वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी एक निवडा :

    • युनिफाइड : तुमचे आवडते संपर्क, अलीकडील कॉल्स आणि व्हॉइसमेल्स स्क्रीनच्या तळाशी असलेल्या ’कॉल्स’ टॅबमध्ये एकत्रित आणि डिस्प्ले केले जातात.

    • क्लासिक : तुमचे आवडते संपर्क, अलीकडील कॉल्स आणि व्हॉइसमेल्स स्क्रीनच्या तळाशी वेगळ्या टॅब्जमध्ये क्रमवार लावले जातात.