तुमचा Mac आणि iPhone कनेक्ट करण्यासाठी Bluetooth वापरणे
macOS 13 किंवा नंतरचे : Apple मेन्यू
> सिस्टीम सेटिंग निवडा, नंतर साइडबारमध्ये ‘Bluetooth®’ वर क्लिक करा. (कदाचित तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल.) उजवीकडे, Bluetooth चालू करा (ते आधीपासून चालू नसल्यास). उजवीकडे तुमचा iPhone सिलेक्ट करा, नंतर ‘कनेक्ट करा’ वर क्लिक करा.macOS 12.5 किंवा त्यापेक्षा आधीचे : Apple मेन्यू
> ‘सिस्टीम प्राधान्ये’ निवडा, नंतर Bluetooth वर क्लिक करा. Bluetooth चालू केले नसल्यास, ‘Bluetooth चालू करा’ वर क्लिक करा. तुमचा iPhone सिलेक्ट करा, नंतर ‘कनेक्ट करा’ वर क्लिक करा.