iPad वर तुमच्या ‘नोट्स’ च्या सेटिंग बदलणे

सेटिंगमध्ये, तुम्ही नोट्स ॲपसाठी तुमची प्राधान्ये कस्टमाइझ करू शकता. नवीन नोट्ससाठी डिफॉल्ट अकाउंट निवडा, पासवर्ड सेट करा, आणि बरेच काही.

तुमच्या ‘नोट्स’ च्या सेटिंग कस्टमाइझ करणे

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ’ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’नोट्स’ ॲपवर टॅप करा.

  3. खालीलपैकी कोणतेही समायोजित करा :

    • अकाउंट : नोट्स ॲपमध्ये अकाउंट समाविष्ट करा किंवा काढून टाका.

    • Siri : Siri ला तुमच्या नोट्सच्या वापराच्या पद्धतीवर आधारित ॲपवर सूचना करण्याची अनुमती द्या.

    • सर्च : ‘नोट्स’ ॲपमधील सूचना आणि कॉण्टेण्ट सर्च आणि विजेट्स मध्ये दिसण्याला अनुमती द्या.

    • नोटिफिकेशन्स : नोटिफिकेशन सेटिंग बदला.

    • भाषा : तुमच्या प्राधान्यकृत भाषा निवडा (जेव्हा अनेक भाषा समाविष्ट केल्या जातात तेव्हा पर्याय दिसतो).

    • डिफॉल्ट अकाउंट : Siri आणि ‘नोट्स’ विजेट वापरून नोट्स तयार करताना डिफॉल्ट अकाउंट निवडा.

    • पासवर्ड : महत्त्वाच्या नोट्स लॉक करा.

    • “माझ्या iPad वर" अकाउंट : ’माझ्या iPad वर’ अकाउंट चालू करा.

    • नोटिफिकेशनचा उल्लेख करा : जेव्हा तुमच्या नावाचा शेअर केलेल्या नोट्समध्ये उल्लेख असेल तेव्हा नोटिफिकेशन प्राप्त करा.

    • बघत आहे : क्रमवार लावणे, लाइन आणि ग्रिड, आणि दिनांकानुसार नोट्स गटबद्ध करणे ह्यासारखे बघण्याचे पर्याय निवडा.

    • क्विक नोट्स : नवीन नोट त्वरित तयार करण्यासाठी किंवा मागील ‘क्विक नोट’ पुन्हा सुरू करण्यासाठी कॉर्नर जेस्चर निवडा.

    • ॲप लिंक : सुचवलेल्या ॲप लिंक मिळवा.

    • टॅगमध्ये ऑटो कन्व्हर्ट करा : स्पेस टाइप करत असताना #टेक्स्ट टॅग मध्ये ऑटोमॅटिकली बदला.

    • ‘छायाचित्र’ मध्ये जतन करा : नोट्समध्ये काढलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ छायाचित्र ॲपमध्ये जतन करा.

    • लॉक स्क्रीनवरून नोट्स ॲक्सेस करा : ‘नेहमी नवीन नोट तयार करा’ किंवा ‘शेवटची नोट पुन्हा सुरू करा’ निवडा. किंवा लॉक स्क्रीनवरून ॲक्सेस टाळण्यासाठी ते बंद करा.

हे देखील पहाiPad वर सेटिंग शोधणे