iPad मध्ये संगीत समाविष्ट करणे आणि ऑफलाइन ऐकणे

जेव्हा तुम्ही Apple Music ची सदस्यता घ्याल, तेव्हा तुम्ही Apple Music ची गाणी आणि व्हिडिओ तुमच्या संगीत लायब्ररीमध्ये समाविष्ट करू शकता आणि डाउनलोड करू शकता. जेव्हा तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असेल तेव्हा तुम्ही iPad मध्ये समाविष्ट केलेले संगीत तुम्ही स्ट्रीम करू शकता. तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट केलेले नसल्यास संगीत प्ले करण्यासाठी, तुम्हाला ते आधी डाउनलोड करावे लागेल.

Siri : काहीतरी प्ले करताना, “Add this to my library” असे काहीतरी Siri ला सांगा. Siri कसे वापरायचे ते जाणून घ्या.

Apple Music मधील संगीत तुमच्या लायब्ररीमध्ये समाविष्ट करणे

  1. तुमच्या iPad वर संगीत ॲपवर जा.

  2. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • गाणे, अल्बम, प्लेलिस्ट किंवा व्हिडिओवर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘लायब्ररीमध्ये समाविष्ट करा’ वर टॅप करा.

    • अल्बम किंवा प्लेलिस्टचा कॉण्टेण्ट बघताना, अल्बम किंवा प्लेलिस्ट समाविष्ट करण्यासाठी स्क्रीनच्या शीर्षस्थानाजवळ ’लायब्ररीमध्ये समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा किंवा गाण्याच्या पुढे अधिक बटण वर टॅप करा, नंतर ते गाणे समाविष्ट करण्यासाठी ‘समाविष्ट करा’ वर टॅप करा.

    • ’आता प्ले होत आहे’ स्क्रीनवर, अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ’समाविष्ट करा’ वर टॅप करा.

जर तुम्ही त्याच Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले असल्यास आणि ‘लायब्ररी सिंक करा’ चालू केलेले असल्यास (सेटिंग  > ॲप >’संगीत’ वर जा, त्यानंतर ‘लायब्ररी सिंक करा’ चालू करा) तुम्ही तुमच्या iPad मध्ये समाविष्ट केलेले संगीत इतर डिव्हाइसेसवर देखील समाविष्ट केले जाते.

Apple Music वरून तुमच्या iPad वर संगीत डाउनलोड करणे

Apple Music मधून संगीत तुमच्या लायब्ररीमध्ये डाउनलोड करण्यापूर्वी, तुम्ही ‘लायब्ररी सिंक करा’ चालू करणे आवश्यक आहे. सेटिंग  > ॲप > ‘संगीत’ वर जा, त्यानंतर ‘लायब्ररी सिंक करा’ चालू करा. त्यानंतर संगीत डाउनलोड करण्यासाठी ह्या सूचनांचे पालन करा.

  1. तुमच्या iPad वर संगीत ॲपवर जा.

  2. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • गाणे, अल्बम किंवा प्लेलिस्ट डाउनलोड करा : तुम्ही तुमच्या लायब्ररीमध्ये समाविष्ट केलेल्या संगीतावर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘डाउनलोड करा’ वर टॅप करा.

      प्लेलिस्ट किंवा अल्बम समाविष्ट केल्यानंतर, तुम्ही स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘डाउनलोड करा’ बटण वर देखील टॅप करू शकता.

    • नेहमी संगीत डाउनलोड करा : सेटिंग  > ॲप्स > ’संगीत’ वर जा, त्यानंतर ‘ऑटोमॅटिक डाउनलोड्स’ सुरू करा.

      तुम्ही समाविष्ट केलेली गाणी ऑटोमॅटिकली iPad वर डाउनलोड केली जातात.

    • डाउनलोडची प्रगती पहा : ‘साइडबार दाखवा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ’डाउनलोड होत आहे’ वर टॅप करा.

नोट : जर तुम्ही डाउनलोड करत असलेले संगीत डॉल्बी ॲटमॉसमध्ये उपलब्ध असेल, तर आयटमच्या पुढे डॉल्बी आयकॉन दिसेल आणि तुम्ही ते डॉल्बी ॲटमॉसमध्ये किंवा स्टिरिओमध्ये डाउनलोड करू शकता. Dolby Atmos मध्ये उपलब्ध असताना संगीत डाउनलोड करण्यासाठी, सेटिंग  > ॲप्स > ‘संगीत’ ॲप वर जा, त्यानंतर ‘Dolby Atmos मध्ये डाउनलोड करा’ चालू करा. iPad वर ‘स्पेशिअल ऑडिओ’ मध्ये ‘डॉल्बी ॲटमॉस’ सह संगीत प्ले करणे पहा.

तुमच्या लायब्ररीमधून संगीत हटवणे

  1. तुमच्या iPad वर संगीत ॲपवर जा.

  2. गाणे, अल्बम, प्लेलिस्ट किंवा संगीत व्हिडिओवर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘लायब्ररीमधून हटवा’ वर टॅप करा.

स्टोरेज स्पेस मॅनेज करणे

स्टोरेज स्पेस मॅनेज करण्यासाठी, खालीलपैकी कोणतेही एक करा :

  • iPad वर संग्रहित केलेले संगीत आणि व्हिडिओ काढून टाका : तुमच्या iPad वरील ‘संगीत’ ॲपवर जा, तुम्ही डाउनलोड केलेल्या आयटमवर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ’डाउनलोड काढून टाका’ वर टॅप करा.

    आयटम iPad वरून काढून टाकण्यात आला आहे, परंतु तुमच्या इतर डिव्हाइसवरील तुमच्या संगीत लायब्ररीमधून काढून टाकण्यात आलेला नाही.

  • संगीत स्टोरेज रिक्त करा : जर iPad मध्ये स्टोरेज स्पेस कमी असेल, तर तुम्ही काही काळापासून प्ले न केलेले डाउनलोड केलेले संगीत तुम्ही ऑटोमॅटिकली काढून टाकू शकता. सेटिंग  > ॲप > संगीत > ‘स्टोरेज ऑप्टिमाइझ करा’ वर जा.

  • iPad मधून सर्व गाणी किंवा विशिष्ट कलाकार काढून टाका : सेटिंग  > ॲप्स > संगीत > ‘डाउनलोड केलेले संगीत’ वर जा, ‘संपादित करा’ वर टॅप करा, नंतर ‘सर्व गाणी’ च्या पुढे हटवा बटण वर किंवा ज्यांचे संगीत तुम्हाला हटवायचे आहे अशा कलाकारांवर टॅप करा.

  • iPad मधून सर्व Apple Music गाणी काढून टाका : सेटिंग > ॲप्स > ‘संगीत’ ॲपवर जा, त्यानंतर ‘लायब्ररी सिंक करा’ बंद करा.

    गाणी iPad मधून काढून टाकली जातात परंतु तुमच्या इतर डिव्हाइसेसवर तुमच्या संगीत लायब्ररीमध्ये राहतात. तुम्ही खरेदी केलेले किंवा सिंक केलेले संगीत देखील राहते.

’संगीत’ साठी मोबाइल डेटा पर्याय निवडणे

तुमच्याकडे iPad चे Wi-Fi + Cellular मॉडेल असल्यास, तुम्ही मोबाइल डेटा पर्याय निवडू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘संगीत’ ॲपवर टॅप करा.

  3. मोबाइल डेटा चालू करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही करा :

    • ‘मोबाइल सेवेवर डाउनलोड करा’ चालू किंवा बंद करा.

    • ‘ऑडिओ गुणवत्ता’ वर टॅप करा, ‘Lossless ऑडिओ’ सुरू करा, त्यानंतर सेटिंग (काहीही नाही, उच्च कार्यक्षमता, उच्च गुणवत्ता, Lossless किंवा उच्च रिझोल्यूशन Lossless) निवडण्यासाठी ‘मोबाइल स्ट्रीमिंग’ वर टॅप करा.

      उच्च कार्यक्षमतेपेक्षा उच्च गुणवत्ता, Lossless आणि उच्च रेझोल्यूशन Lossless हे मोबाइल डेटाचा लक्षणीयरीत्या अधिक वापर करतात, ज्यासाठी तुमच्या मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडरकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. गाणी प्ले करणे सुरू होण्यासदेखील जास्त वेळ लागू शकतो.

जेव्हा तुम्ही चित्रपट, TV शो, संगीत, संगीत व्हिडिओ, ईबुक, ऑडिओबुक किंवा Apple मधील रिंगटोनचा ॲक्सेस खरेदी करता, तेव्हा तुमच्याकडे हे आयटम सुसंगत iPhone, iPad, Mac किंवा PC वर कायमस्वरूपी डाउनलोड करण्याचा पर्याय देखील असतो. Apple तुमचा डाउनलोड केलेला कॉण्टेण्ट रद्द करू शकत नाही आणि तुम्ही तुमचा डाउनलोड केलेला कॉण्टेण्ट इंटरनेट कनेक्शनशिवाय नेहमी ॲक्सेस करू शकता.