iPad तुमच्या टचला कसा प्रतिसाद देतो हे ॲडजस्ट करणे

तुम्हाला हाताचे कंपण, कौशल्य किंवा फाइन मोटर कंट्रोलमध्ये अडचणी येत असल्यास, ‘टॅप’, ‘स्वाइप’ आणि ‘टच आणि होल्ड’ जेस्चरसाठी iPad टचस्क्रीन कशा प्रकारे प्रतिसाद देते हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तुम्ही iPad साठी जलद किंवा हळुवार टच ओळखू शकता आणि अनेक टचकडे दुर्लक्ष करू शकता. स्क्रीनला टच केल्यावर तुम्ही iPad ला सक्रिय होण्यापासून देखील रोखू शकता, किंवा तुम्ही नकळतपणे iPad हलवल्यास ‘पूर्ववत करण्यासाठी शेक करा’ बंद करू शकता.

टॅप, स्वाइप आणि अनेक टचसाठी सेटिंग ॲडजस्ट करणे

  1. सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > टच > ‘टच सुविधा’ वर जा, नंतर ‘टच सुविधा’ चालू करा.

  2. तुम्ही पुढीलपैकी कोणतेही काम करण्यासाठी iPad कॉन्फिगर करू शकता :

    • अधिक लांब किंवा अधिक लहान टचेसला प्रतिसाद द्या : ‘कालावधी होल्ड करा’ चालू करा, नंतर कालावधी ॲडजस्ट करण्यासाठी ‘कमी करा’ बटण किंवा वाढवा बटण वर टॅप करा.

      नोट : जेव्हा तुम्ही ‘होल्ड कालावधी’ चालू करता, तेव्हा कालावधीमधील टॅप्स आणि स्वाइप्स दुर्लक्षित केले जातात. ‘होल्ड कालावधी’ ऑन केलेला असताना स्वाइप करणे सोपे करण्यासाठी तुम्ही ‘स्वाइप जेस्चर्स’ चालू करू शकता.

    • ‘होल्ड कालावधी’ ऑन केलेला असताना स्वाइप करणे अधिक सोपे करा : ‘होल्ड कालावधी’ चालू करा, नंतर ‘स्वाइप जेस्चर्स’ वर टॅप करा. ‘स्वाइप जेस्चर्स’ चालू करा, नंतर स्वाइप जेस्चर सुरू होण्यापूर्वी आवश्यक हालचाल निवडा.

    • अनेक टच एकच टच म्हणून समजा : ‘रिपीटकडे दुर्लक्ष करा’ चालू करा, नंतर अनेक टच दरम्यान अनुमती दिलेल्या वेळेचे प्रमाण ॲडजस्ट करण्यासाठी ‘कमी करा’ बटण किंवा वाढवा बटण वर टॅप करा.

    • तुम्ही टच केलेल्या पहिल्या किंवा शेवटच्या ठिकाणाला प्रतिसाद द्या : ‘टॅप सहाय्य’ अंतर्गत, ‘प्रारंभिक टचचे स्थान वापरा’ किंवा ‘अंतिम टचचे स्थान वापरा’ ह्यापैकी एक निवडा.

      तुम्ही ‘प्रारंभिक टचचे स्थान वापरा’ निवडल्यास, iPad तुमच्या पहिल्या टॅपचे स्थान वापरतो—उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही होम स्क्रीनवरील ॲपवर टॅप करता.

      तुम्ही ’अंतिम टचचे स्थान वापरा’ निवडल्यास, तुम्ही जिथे बोट उचलता त्या टॅपची iPad नोंदणी करतो. जेव्हा तुम्ही विशिष्ट कालावधीत बोट उचलता तेव्हा iPad टॅपला प्रतिसाद देतो. वेळ ॲडजस्ट करण्यासाठी ‘कमी करा’ बटण किंवा वाढवा बटण वर टॅप करा. तुम्ही जेस्चर विलंब पेक्षा जास्त वेळ थांबल्यास, तुमचा iPad इतर जेस्चरला प्रतिसाद देऊ शकतो, उदाहरणार्थ ड्रॅग जेस्चर.

      नोट : जेव्हा तुम्ही ‘टॅप सहाय्य’ सुरू करता, तेव्हा कालावधीमधील टॅप्स आणि स्वाइप्स दुर्लक्षित केले जातात. ‘होल्ड कालावधी’ ऑन केलेला असताना स्वाइप करणे सोपे करण्यासाठी तुम्ही ‘स्वाइप जेस्चर्स’ सुरु करू शकता.

    • ‘टॅप सहाय्य’ ऑन केलेले असताना स्वाइप करणे अधिक सोपे करा : ‘प्रारंभिक टचचे स्थान वापरा’ किंवा ‘अंतिम टचचे स्थान वापरा’ यापैकी एक निवडा, नंतर ‘स्वाइप जेस्चर्स’ वर टॅप करा. ‘स्वाइप जेस्चर्स’ सुरू करा, नंतर स्वाइप जेस्चर सुरू होण्यापूर्वी आवश्यक हालचाल निवडा.

टच आणि होल्ड जेस्चरसाठी सेटिंग ॲडजस्ट करणे

तुम्ही अतिरिक्त पर्याय किंवा तुम्ही केलेले कृती पाहण्यासाठी किंवा कॉण्टेंटचा प्रिव्ह्यू बघण्यासाठी तुम्ही टच आणि होल्ड जेस्चर वापरता. तुम्हाला हे जेस्चर करण्यात अडचण येत असल्यास, पुढील गोष्टी करा :

  1. सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > टच > ‘हॅप्टिक टच’ वर जा.

  2. टचसाठी कालावधी निवडा—जलद किंवा हळू.

  3. स्क्रीनच्या तळाशी इमेजवर तुमच्या नवीन सेटिंग तपासा.

सक्रिय करण्यासाठी ‘टॅप करा’ बंद करणे

सपोर्ट करणाऱ्या iPad मॉडेल वर तुम्ही iPad ला स्क्रीनवर टच होण्यापासून रोखू शकता. सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > ‘टच’ वर जा, नंतर ‘सक्रिय करण्यासाठी टॅप करा’ चालू करा.

पूर्ववत करण्यासाठी ‘शेक करा’ बंद करणे

तुम्ही नकळतपणे iPad शेक करत असल्यास, तुम्ही ‘पूर्ववत करण्यासाठी शेक करा’ बंद करू शकता. सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > ‘टच’ वर जा.

टिप : टेक्स्ट संपादन पूर्ववत करण्यासाठी, तीन बोटांनी डावीकडे स्वाइप करा.