iPad वर ‘नोट्स’ मध्ये रेखाचित्रे आणि हस्ताक्षर समाविष्ट करणे
Apple Pencil सह किंवा तुमच्या बोटाने स्केच काढण्यासाठी किंवा हस्तलिखित नोट लिहिण्यासाठी नोट्स ॲप वापरा (सपोर्ट करणाऱ्या मॉडेल वर). विविध मार्कअप टूल आणि रंगांमधून निवडा, आणि पट्टीने सरळ रेषा काढा. जेव्हा तुम्ही Apple Pencil सह लिहिता, तेव्हा तुमच्या स्वतःच्या हस्तलेखन शैलीचा लूक आणि फील कायम ठेवत तुमच्या हस्तलेखनाला अधिक सुवाच्य करण्यासाठी रिअल टाइममध्ये ऑटोमॅटिकली रिफाइन केले जाऊ शकते.

रेखाचित्र आणि हस्तलेखन टूल वापरणे
तुमच्या iPad वर ‘नोट्स’ ॲपवर
जा.नोटमध्ये, Apple Pencil सह रेखाटणे किंवा लिहिणे सुरू करा. किंवा तुमच्या बोटाने रेखाटण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी
वर टॅप करा.पुढीलपैकी कोणतेही एक करा :
रंग किंवा टूल बदला : मार्कअप टूल वापरा.
हस्ताक्षर क्षेत्र समायोजित करा : आकार बदलण्याचे हॅण्डल (डावीकडे) वर किंवा खाली ड्रॅग करा.
Apple Pencil वापरून लिहिताना टाइप केलेल्या टेक्स्टमध्ये तुमचे हस्तलेखन ट्रान्स्क्राइब करा : ‘स्क्रिबल’ टूल
(पेनच्या डाव्या बाजूला) वर टॅप करा, त्यानंतर लिहिणे सुरू करा.नोट : सपोर्ट केलेल्या भाषांमध्ये ‘स्क्रिबल’ उपलब्ध आहे. iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ पहा. Apple Pencil सह नोट्स लिहिण्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, 'स्क्रिबल' सह टेक्स्ट प्रविष्ट करा पहा.
टिप : तुम्ही हस्तलिखित टेक्स्ट (ने सपोर्ट केलेल्या भाषांमध्ये) नोट्समध्ये सर्च करू शकता. नोटचे शीर्षक नसल्यास, हस्तलिखित टेक्स्टची पहिली ओळ सुचवलेले शीर्षक होईल. शीर्षक संपादित करण्यासाठी, नोटच्या शीर्षस्थानी स्क्रोल करा, नंतर ‘संपादित करा’ वर टॅप करा.
रेखाचित्रे आणि हस्ताक्षर सिलेक्ट आणि संपादित करणे
‘स्मार्ट सिलेक्शन’ सह, टाइप केलेल्या टेक्स्टसाठी तुम्ही वापरत असलेले समान जेश्चर वापरून तुम्ही रेखाटने आणि हस्ताक्षर सिलेक्ट करू शकता. तुम्ही नोटमध्ये सिलेक्शन मूव्ह करू शकता, कॉपी करू शकता, किंवा हटवू शकता. तुम्ही ते दुसऱ्या नोट किंवा ॲपमध्ये टाइप केलेले टेक्स्ट म्हणून देखील पेस्ट करू शकता.
नोट : तुमच्या iPad ची सिस्टीम भाषा सेटिंग
> सामान्य > भाषा व प्रदेश > ‘iPad भाषा’ मध्ये सपोर्ट केलेल्या भाषेवर सेट केलेली असल्यास ‘स्मार्ट सिलेक्शन’ आणि हस्तलेखन ट्रान्सस्क्रिप्शन काम करते. iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ पहा.
तुमच्या iPad वर ‘नोट्स’ ॲपवर
जा.नोटमध्ये, खालीलपैकी कोणत्याही पद्धतीचा वापर करून तुमच्या बोटाने रेखाचित्रे आणि हस्ताक्षर सिलेक्ट करा :
लासो टूलसह :
वर टॅप करा,
वर टॅप करा (टूल पॅलेटमधील इरेझर आणि ‘इमेज वॉंड’ च्या दरम्यान), नंतर तुम्हाला सिलेक्ट करायचे असलेल्या ऑब्जेक्टची आउटलाइन तयार करण्यासाठी तुमचे बोट वापरा.जेस्चरसह :
टच आणि होल्ड करा, नंतर सिलेक्शन विस्तृत करण्यासाठी ड्रॅग करा.
शब्द सिलेक्ट करण्यासाठी डबल टॅप करा.
वाक्य सिलेक्ट करण्यासाठी ट्रिपल टॅप करा.
आवश्यकतेनुसार सिलेक्शन ॲडजस्ट करण्यासाठी हॅण्डल ड्रॅग करा.
सिलेक्शनवर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक निवडा :
कट करा
कॉपी करा
हटवा
डुप्लिकेट करा
Playground मध्ये समाविष्ट करा
‘टेक्स्ट’ म्हणून कॉपी करा
वर स्पेस इन्सर्ट करा
भाषांतर
हस्तलिखित टेक्स्टने काम करणे
iPad तुमच्या हस्ताक्षराला ओघवते, नीटनेटके आणि अधिक सुवाच्च बनवण्यासाठी रिफाइन करू शकते. तुम्ही तुमच्या हस्तलेखनामध्ये टाइप केलेले टेक्स्ट पेस्ट करू शकता किंवा रूपांतरित देखील करू शकता, इनलाइन स्पेलिंग दुरुस्त करू शकता आणि हस्तलेखन मूव्ह किंवा हटवू शकता.
तुमच्या iPad वर ‘नोट्स’ ॲपवर
जा.नोटमध्ये, हस्तलेखन सिलेक्ट करा.
पुढीलपैकी कोणतेही एक करा :
सुधारणा करा : तुमचे लेखन ओघवते, नीटनेटके आणि अधिक सुवाच्च बनवण्यासाठी ’रिफाइन 1’वर टॅप करा.
तुमचे हस्तलेखन ऑटोमॅटिकली सुधारित करण्यासाठी
वर टॅप करा,
वर टॅप करा, नंतर ‘हस्तलेखन ऑटोमॅटिकली सुधारित करा’ सुरू करा.तुमचे लेखन अधिक चांगले बनवा : ‘सरळ करा’ वर टॅप करा.
योग्य स्पेलिंग : अधोरेखित शब्दावर टॅप करा, नंतर तुम्हाला तो कसा दुरुस्त करायचा आहे ते निवडा. फिक्स तुमच्या स्वतःच्या लेखन शैलीमध्ये दिसते.
हस्ताक्षर मूव्ह करा : सिलेक्ट केलेल्या टेक्स्टवर टच आणि होल्ड करा, नंतर त्याला नवीन स्थानावर ड्रॅग करा.
टेक्स्ट ऑब्जेक्टला हस्तलेखनामध्ये रूपांतरित करा : रेखाचित्र क्षेत्रामध्ये टेक्स्ट ऑब्जेक्टवर टॅप करा,
वर टॅप करा, त्यानंतर ’हस्तलेखन मध्ये रूपांतरित करा’ वर टॅप करा. (ह्या फीचर2 साठी तुमच्या हस्तलेखनामध्ये आधी जतन केलेल्या आणि किमान 10 एकमेव छोट्या लिपीतील अक्षरे असणाऱ्या नोट्सची आवश्यकता आहे.)टाइप केलेले टेक्स्ट तुमच्या हस्ताक्षरामध्ये पेस्ट करा : ‘नोट्स’ मधील हस्तलेखन भागात; वेबपृष्ठ, डॉक्युमेंट किंवा ईमेलमधून टेक्स्ट सिलेक्ट आणि कॉपी करा, नंतर ‘पेस्ट करा’ वर टॅप करा. (ह्या फीचर2 साठी तुमच्या हस्तलेखनामध्ये आधी जतन केलेल्या आणि किमान 10 एकमेव छोट्या लिपीतील अक्षरे असणाऱ्या नोट्सची आवश्यकता आहे.)
टेक्स्ट इरेझ करण्यासाठी, लेखन स्क्रॅच आउट करा, नंतर iPad वर तुमचे लेखन उपकरण (उदाहरणार्थ Apple Pencil किंवा तुमचे बोट) होल्ड करा. (‘पेन’, ‘मोनो लाइन’ किंवा ‘मार्कर’ सारखे मार्कअप टूल वापरताना सपोर्ट केले जाते.)
इतर ॲपमधून इमेज ड्रॅग करणे
तुम्ही इतर ॲपमधून नोटमध्ये इमेज ड्रॅग करू शकता आणि त्यांना हाताने लिहिलेल्या आणि रेखाटलेल्या कॉण्टेंटने एकत्रित करू शकता. तुम्ही रेखांकन भागामध्ये इमेज समाविष्ट केल्यानंतर, तुम्ही इमेजची जागा आणि आकार बदलू शकता.
इमेज वॉण्ड वापरणे
जर Apple Intelligence* सुरू केलेले असेल, तर तुम्ही तयार केलेल्या रफ स्केचेसवर आधारित इमेजेस तयार करण्यासाठी ‘नोट्स’ मधील ‘इमेज वॉण्ड’ वापरू शकता. आजूबाजूच्या भागातील शब्द आणि इमेजेसवर आधारित इमेज तयार करण्यासाठी तुम्ही रिकामी जागा देखील सिलेक्ट करू शकता. Apple Intelligence सह 'इमेज वॉण्ड' वापरा पहा.