बॅकअपमधून iPad वर सर्व कॉण्टेण्ट रीस्टोअर करणे

तुम्ही बॅकअपमधून नवीन किंवा नव्याने इरेझ करून हटविलेल्या iPad मध्ये कॉण्टेण्ट, सेटिंग आणि ॲप रीस्टोअर करू शकता.

महत्त्वाचे : तुमचा iPad रीस्टोअर करण्यासाठी, तुमच्याकडे रीस्टोअर करण्यासाठी बॅकअप असणे आवश्यक आहे. iPad चा बॅक अप घेणे पहा.

iCloud बॅकअपमधून iPad रीस्टोअर करणे

  1. तुमचा iPad चालू करा.

    हॅलो स्क्रीन अशी दिसायला हवी. तुम्ही तुमचे डिव्हाइस आधीच सेट अप केलेले असल्यास, तुमच्या बॅकअपमधून रीस्टोअर करण्यासाठीच्या ह्या पायऱ्या वापरण्यापूर्वी तुम्ही सर्व कॉण्टेण्ट इरेझ करणे गरजेचे असेल.

  2. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • ‘मॅन्युअली सेटअप करा’ वर टॅप करा, ‘iCloud बॅकअपमधून रीस्टोअर करा’ वर टॅप करा, नंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

    • तुमच्याकडे iOS 11, iPadOS 13 किंवा नंतरच्या व्हर्जनसह इतर iPhone, iPad किंवा iPod touch असल्यास, तुम्ही तुमचे नवीन डिव्हाइस ऑटोमॅटिकली सेट अप करण्यासाठी ‘क्विक स्टार्ट’ वापरू शकता. दोन्ही डिव्हाइस एकत्र जवळ आणा, नंतर तुमच्या बऱ्याच सेटिंग, प्राधान्ये आणि iCloud कीचेन सुरक्षितपणे कॉपी करण्यासाठी ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या iCloud बॅकअपमधून तुमचा उर्वरित डेटा आणि कॉण्टेंट तुमच्या नवीन डिव्हाइसवर रीस्टोअर करू शकता.

      किंवा, दोन्ही डिव्हाइसवर iOS 12.4, iPadOS 13 किंवा नंतरचे व्हर्जन असल्यास, तुम्ही तुमचा सर्व डेटा तुमच्या आधीच्या डिव्हाइसवरून तुमच्या नवीन डिव्हाइसमध्ये वायरलेस पद्धतीने ट्रान्सफर करू शकता. मायग्रेशन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुमचे डिव्हाइस एकमेकांच्या जवळ ठेवा आणि पॉवरमध्ये प्लग इन करा.

तुम्हाला तुमच्या Apple अकाउंटसाठी विचारले जाते. तुम्ही तुमचे Apple अकाउंट विसरल्यास, iforgot.apple.com वर जा.

संगणक बॅकअपमधून iPad रीस्टोअर करणे

  1. USB वापरताना, तुमचा बॅकअप असलेल्या संगणकाला नवीन किंवा ज्यातील डेटा नुकताच इरेझ केलेला आहे असा iPad कनेक्ट करा.

  2. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • Mac वर (macOS 10.15 किंवा नंतरचे व्हर्जन) : Finder साइडबार मध्ये, तुमचा iPad सिलेक्ट करा, ‘विश्वास ठेवा’ वर क्लिक करा, नंतर “बॅकअपमधून रीस्टोअर करा” वर क्लिक करा.

    • Mac (macOS 10.14 किंवा त्याआधीचे व्हर्जन) किंवा Windows डिव्हाइसवर : iTunes ॲप उघडा, iTunes विंडोच्या शीर्षस्थानी डावीकडे iPad सारख्या दिसणाऱ्या बटणावर क्लिक करा, ‘सारांश’ वर क्लिक करा, नंतर ‘बॅकअप रीस्टोअर करा’ वर क्लिक करा.

      नोट : iTunes चे नवीनतम व्हर्जन वापरा. iTunes च्या नवीनतम व्हर्जनवर अपडेट करा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

  3. यादीतून तुमचा बॅकअप निवडा, नंतर ‘चालू ठेवा’ वर क्लिक करा.

तुमचा बॅकअप एनक्रिप्ट केलेला असल्यास, तुमच्या फाइल आणि सेटिंग रीस्टोअर करण्यापूर्वी तुम्ही पासवर्ड प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

तुमचा iPhone, iPad किंवा iPod touch बॅकअपमधून रीस्टोअर करा आणि तुम्ही तुमचा iPhone, iPad किंवा iPod touch रीस्टोअर किंवा अपडेट करू शकत नसल्यास काय करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.