iPad वर VoiceOver सह ऑनस्क्रीन कीबोर्ड वापरणे
संपादन करण्यायोग्य टेक्स्ट फील्ड सक्रिय केल्यावर VoiceOver तुम्ही ऑनस्क्रीन कीबोर्डचा वापर करण्याची पद्धत बदलते. तुम्ही टेक्स्ट प्रविष्ट करू शकता, सिलेक्ट करू शकता आणि हटवू शकता; कीबोर्डची भाषा बदलू शकता; आणि बरेच काही करू शकता.
ऑनस्क्रीन कीबोर्डने टेक्स्ट प्रविष्ट करणे
टेक्स्ट फील्ड सिलेक्ट करा, नंतर डबल टॅप करा.
इन्सर्शन पॉइंट आणि ऑनस्क्रीन कीबोर्ड दिसत आहेत.
टेक्स्ट प्रविष्ट करण्यासाठी, पुढीलपैकी एक करा :
स्टॅण्डर्ड टायपिंग : कीबोर्डवर डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करून ‘की’ सिलेक्ट करा, नंतर वर्ण प्रविष्ट करण्यासाठी डबल टॅप करा. किंवा ‘की’ सिलेक्ट करण्यासाठी तुमचे बोट कीबोर्डच्या भोवती फिरवा आणि एका बोटाने ‘की’ ला टच करत असताना दुसऱ्या बोटाने स्क्रीनवर टॅप करा. VoiceOver सिलेक्ट केल्यावर की बोलेल आणि पुन्हा वर्ण प्रविष्ट केल्यावर बोलेल.
टच टायपिंग : कीबोर्ड सिलेक्ट करण्यासाठी ‘की’ वर टच करा, नंतर वर्ण प्रविष्ट करण्यासाठी तुमचे बोट वर उचला. तुम्ही चुकीच्या ‘की’ ला टच केल्यास, तुमचे बोट तुम्हाला हव्या असलेल्या ‘की’ वर स्लाइड करा. VoiceOver प्रत्येक ‘की’ ला टच करत असताना त्यासाठीचा वर्ण बोलतो, परंतु जोपर्यंत तुम्ही बोट उचलत नाही तोपर्यंत वर्ण प्रविष्ट करत नाही.
डायरेक्ट टच टायपिंग : VoiceOver केवळ कीबोर्डसाठी डिसेबल केला गेला आहे, त्यामुळे VoiceOver बंद असताना जसे तुम्ही टाइप करता तसेच तुम्ही टाइप करू शकता.
श्रुतलेखन : श्रुतलेखन सुरू करण्यासाठी आणि थांबवण्यासाठी कीबोर्डवर दोन बोटांचे डबल टॅप वापरा.
उच्चारण वर्ण प्रविष्ट करण्यासाठी, पुढीलपैकी एक करा :
स्टॅण्डर्ड टायपिंग : साधा वर्ण सिलेक्ट करा, नंतर डबल टॅप करा आणि जोपर्यंत तुम्हाला पर्यायी वर्ण दिसल्याचा टोन ऐकू येत नाही तोपर्यंत होल्ड करा. पर्याय सिलेक्ट करण्यासाठी आणि ऐकण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे ड्रॅग करा. सध्याचे सिलेक्शन प्रविष्ट करण्यासाठी तुमचे बोट रिलीज करा.
टच टायपिंग : पर्यायी वर्ण दिसू लागेपर्यंत ‘वर्ण’ टच आणि होल्ड करून ठेवा.
ऑनस्क्रीन कीबोर्डसह टेक्स्ट संपादित करणे
इन्सर्शन पॉइंट मूव्ह करा : टेक्स्टमधील इन्सर्शन पॉइंट पुढे किंवा मागे मूव्ह करण्यासाठी ‘वर’ किंवा ‘खाली’ स्वाइप करा. तुम्हाला इन्सर्शन पॉइंट वर्णानुसार, शब्दानुसार किंवा ओळीप्रमाणे मूव्ह करायचा आहे की नाही हे निवडण्यासाठी रोटर वापरा. ‘सुरुवात’ किंवा ‘समाप्त’ वर जाण्यासाठी, टेक्स्टवर डबल टॅप करा.
इन्सर्शन पॉइंट मूव्ह झाल्यानंतर आणि इन्सर्शन पॉइंट ज्या वर्ण, शब्द किंवा रेषेच्या पलीकडे सरकतो ते बोलल्यावर VoiceOver ध्वनी येतो. शब्दांप्रमाणे पुढे जात असताना, प्रत्येक शब्दाच्या शेवटी, स्पेस किंवा नंतर येणाऱ्या विरामचिन्हाच्या आधी इन्सर्शन पॉइंट ठेवला जातो. मागे सरकताना, इन्सर्शन पॉइंट आधीच्या शब्दाच्या शेवटी, स्पेसच्या किंवा नंतर येणाऱ्या विरामचिन्हाच्या आधी ठेवला जातो.
इन्सर्शन पॉइंट शब्द किंवा वाक्याच्या शेवटी विरामचिन्हाच्या पुढे मूव्ह करा : वर्ण मोडवर परत स्विच करण्यासाठी रोटर वापरा.
ओळीप्रमाणे इन्सर्शन पॉइंट मूव्ह करताना, तुम्ही प्रत्येक ओळीवर असताना VoiceOver देखील त्यानुसार प्रत्येक ओळ बोलतो. पुढे जात असताना, इन्सर्शन पॉइंट पुढील ओळीच्या सुरुवातीला ठेवला जातो (तुम्ही परिच्छेदाच्या शेवटच्या ओळीवर पोहोचण्याव्यतिरिक्त, इन्सर्शन पॉइंट नुकत्याच बोललेल्या ओळीच्या शेवटी मूव्ह केला गेला असल्यास). मागे जात असताना, बोलल्या जाणाऱ्या रेषेच्या सुरुवातीला इन्सर्शन पॉइंट ठेवला जातो.
वर्ण हटवा :
वापरा.टेक्स्ट सिलेक्ट करा : पुढीलपैकी कोणतेही काम करा :
रोटर ‘टेक्स्ट सिलेक्शन’ वर सेट करा, वर्ण, शब्द, ओळ किंवा वाक्य निवडण्यासाठी ‘वर’ किंवा ‘खाली’ स्वाइप करा, नंतर ‘मागे’ किंवा ‘पुढे’ जाण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा. (तुम्हाला ‘टेस्क्ट सिलेक्शन’ एनेबल करण्याची गरज भासू शकते—सेटिंग
> ॲक्सेसिबिलिटी > VoiceOver > ‘रोटर’ वर जा.)रोटर ’संपादित करा’ वर सेट करा, ’सिलेक्ट करा’ किंवा ’सर्व सिलेक्ट करा’ निवडण्यासाठी ‘वर’ किंवा ‘खाली’ स्वाइप करा, नंतर डबल टॅप करा. तुम्ही ‘सिलेक्ट करा’ निवडल्यास, तुम्ही डबल टॅप केल्यावर इन्सर्शन पॉइंटच्या सर्वात जवळचा शब्द सिलेक्ट केला जाईल. सिलेक्शन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी, पॉप-अप मेन्यू डिस्मिस करण्यासाठी दोन बोटांनी स्क्रब करा (दोन बोटे तीन वेळा वेगाने मागे आणि पुढे मूव्ह करा, “z” बनवा), नंतर पिंच करा.
कट, कॉपी किंवा पेस्ट करा : रोटर ’संपादित करा’ वर सेट करा, टेक्स्ट सिलेक्ट करा, ’कट करा’, ’कॉपी करा’ किंवा ’पेस्ट करा’ निवडण्यासाठी ‘वर’ किंवा ‘खाली’ स्वाइप करा, नंतर डबल टॅप करा.
चुकीचे शब्दलेखन दुरुस्त करा : रोटर ‘चुकीचे शब्दलेखन’ वर सेट करा, नंतर मागील किंवा पुढील चुकीच्या शब्दावर जाण्यासाठी ‘वर’ किंवा ‘खाली’ स्वाइप करा. सुचवलेल्या ‘अदला-बदल’ ची निवड करण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा, नंतर ‘अदला-बदल’ वापरण्यासाठी डबल टॅप करा.
पूर्ववत करा : iPad हलकेच हलवा, पूर्ववत करण्याची कृती निवडण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा, नंतर डबल-टॅप करा.
कीबोर्ड सेटिंग बदलणे
सेटिंग
> ॲक्सेसिबिलिटी > ‘VoiceOver’ वर जा.पुढीलपैकी कोणत्याही एकावर टॅप करा :
टाइप करण्याची शैली : तुम्ही नवीन स्टाइल निवडू शकता. किंवा, रोटर टायपिंग मोडवर सेट करा, नंतर ‘वर’ किंवा ‘खाली’ स्वाइप करा.
फोनेटिक फीडबॅक : अक्षरानुसार टेक्स्टवरील वर्ण बोला. VoiceOver आधी वर्ण बोलतो, नंतर त्याचे फोनेटिक साम्य असलेले—उदाहरणार्थ, “f” आणि नंतर “foxtrot.
फीडबॅक टाइप करणे : बोलण्यासाठी ‘वर्ण’, ‘शब्द’, ‘दोन्ही’ किंवा ‘काहीच नाही’ निवडा.
शब्द अतिरेक : ‘टेक्स्ट हटवले जात आहे’ वर टॅप करा. VoiceOver द्वारे लोअर पिचमध्ये हटवलेले वर्ण बोलण्यासाठी, ‘पिच बदला’ वर टॅप करा.