iPad वर VoiceOver चालू करणे आणि त्याचा सराव करणे

VoiceOver सह—जेस्चर आधारित स्क्रीन रीडरसह—तुम्हाला स्क्रीन दिसत नसली तरीही तुम्ही iPad वापरू शकता. VoiceOver तुमच्या स्क्रीनवर काय आहे ह्याचे ऐकू येईल असे वर्णन देते—उदाहरणार्थ, ‘बॅटरी लेव्हल ऐका’, ‘कोण कॉल करत आहे’, किंवा ‘तुमचे बोट कोणत्या आयटम’ वर आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार VoiceOver बोलणारा आवाज देखील कस्टमाइझ करू शकता.

जेव्हा तुम्ही स्क्रीनला टच करता किंवा त्यावर तुमचे बोट ड्रॅग करता, VoiceOver आयकॉन आणि टेक्स्टसह तुमच्या बोट ज्यावर आहे त्या आयटमचे नाव सांगते. आयटमशी संवाद साधण्यासाठी, जसे की बटण किंवा लिंक, किंवा दुसऱ्या आयटमवर नॅव्हिगेट करण्यासाठी, VoiceOver जेस्चर वापरा.

जेव्हा तुम्ही नवीन स्क्रीनवर जाता, तेव्हा VoiceOver ध्वनी प्ले करतो, नंतर स्क्रीनवरील पहिल्या आयटमचे नाव सिलेक्ट करतो आणि सांगतो (सामान्यतः वरच्या डाव्या कोपऱ्यामध्ये). VoiceOver तुम्हाला सांगते की स्क्रीन लॅण्डस्केप किंवा पोर्ट्रेट ओरिएंटेशनमध्ये केव्हा बदलते, स्क्रीन डिम किंवा लॉक केव्हा होते आणि तुम्ही फोन चालू केल्यावर iPad लॉक स्क्रीनवर काय सक्रिय असते.

VoiceOver चालू किंवा बंद करणे

महत्त्वाचे : तुम्ही iPad नियंत्रित करण्यासाठी वापरत असलेले जेस्चर ViceOver बदलते. जेव्हा VoiceOver चालू असेल, तेव्हा तुम्हाला iPad ऑपरेट करण्यासाठी VoiceOver जेस्चर वापरावे लागेल.

VoiceOver चालू किंवा बंद करण्यासाठी, पुढीलपैकी कोणतेही एक करा :

  • सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > ‘VoiceOver’ वर जा, नंतर VoiceOver चालू किंवा बंद करा.

  • तुम्ही तेथे VoiceOver समाविष्ट केलेले असल्यास कंट्रोल सेंटर वापरा.

  • तुम्ही VoiceOver चालू करण्यासाठी सेट केलेले असल्यास, ॲक्सेसिबिलिटी शॉर्टकट वापरा.

Siri : “Turn on VoiceOver.” ह्यासारखे काहीतरी Siri ला सांगा Siri कसे वापरायचे ते जाणून घ्या.

VoiceOver केव्हा चालू असते हे Siri ला माहीत असते आणि अनेकदा स्क्रीनवर दिसणाऱ्या माहितीपेक्षा जास्त माहिती तुम्हाला परत पाठवली जाते. Siri स्क्रीनवर काय दाखवते हे वाचण्यासाठी तुम्ही VoiceOver देखील वापरू शकता.

VoiceOver शिकण्यासाठी परस्परसंवादी ट्यूटोरियल वापरणे

तुम्ही संवादात्मक VoiceOver ट्युटोरियलसह VoiceOver मूलभूत गोष्टी शिकू शकता आणि आवश्यक जेस्चरचा सराव करू शकता.

VoiceOver चालू असताना, सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > ‘VoiceOver’ वर जा, नंतर सुरू करण्यासाठी ‘VoiceOver ट्यूटोरिअल’ वर टॅप करा.

VoiceOver जेस्चरचा सराव करणे

कोणतीही कृती न करता किंवा iPad वर परिणाम होऊ न देता—तुम्ही VoiceOver सराव क्षेत्राचा वापर करून VoiceOver जेस्चर सुरक्षितपणे वापरून पाहू शकता आणि ते काय करतात ते ऐकू शकता.

तुमच्यासाठी कोणते सर्वोत्तम आहे हे शोधण्यासाठी विविध तंत्र वापरा. जेस्चर काम करत नसल्यास, विशेषतः डबल टॅप किंवा स्वाइप जेस्चरसाठी त्वरित हालचाल करण्याचा प्रयत्न करा. स्वाइप करण्यासाठी, तुमच्या बोटाने किंवा बोटांनी स्क्रीन त्वरित ब्रश करण्याचा प्रयत्न करा. मल्टीफिंगर जेस्चर वापरून सर्वोत्तम परिणामांसाठी, तुमच्या बोटांच्या मध्ये थोडी जागा ठेवून स्क्रीनला टच करा.

  1. सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > ‘VoiceOver’ वर जा.

  2. VoiceOver चालू करा, ‘व्हॉइसओव्हर सराव’ वर टॅप करा, नंतर सुरू करण्यासाठी डबल टॅप करा.

  3. पुढील जेस्चरचा एक, दोन, तीन आणि चार बोटांनी सराव करा :

    • टॅप करा

    • डबल टॅप करा

    • ट्रिपल टॅप करा

    • डावीकडे, उजवीकडे, वर किंवा खाली स्वाइप करा

  4. जेव्हा तुम्ही सराव पूर्ण कराल, तेव्हा ’पूर्ण’ वर टॅप करा, नंतर बाहेर पडण्यासाठी डबल टॅप करा.