iPad वर Safari ॲपसह सुरुवात करणे

Safari ॲप तुमच्या iPad वर इंटरनेट आणते. तुम्ही वेब ब्राउझ करू शकता, नंतर पुन्हा भेट देण्यासाठी संकेतस्थळांना बुकमार्क करू शकता, तुमची ब्राउझिंग ॲक्टिव्हिटी गोपनीय ठेवू शकता आणि बरेच काही करू शकता.

उघडलेले वेबपृष्ठ. वरच्या बाजूला, डावीकडून उजवीकडे, ‘साइडबार’ बटण, ‘मागील’ बटण, सर्च फील्ड, ’शेअर करा’ बटण, ’नवीन टॅब’ बटण आणि ’टॅब ओव्हरव्ह्यू’ बटण आहे.

वेब ब्राउझ करणे

वेब सर्फ करा किंवा विशिष्ट प्रश्नांची उत्तरे शोधा. विंडोच्या शीर्षस्थानी असलेल्या सर्च फील्डमध्ये, वेबपेजचे नाव किंवा वेब ॲड्रेस प्रविष्ट करा किंवा काही शब्द, वाक्यांश किंवा प्रश्न टाइप करा.

उघडलेले वेबपृष्ठ. ‘AirDrop’, ‘संदेश’, ‘Mail’, ‘नोट्स’, ‘कॉपी करा’, ‘बुकमार्क्समध्ये समाविष्ट करा’, ‘वाचन यादीमध्ये समाविष्ट करा’ आणि बरेच काही ह्यांचे पर्याय दाखवणारे ‘शेअर करा’ बटण टॅप केले गेले आहे.

संकेतस्थळ बुकमार्क करणे

नंतर पुन्हा भेट देण्यासाठी संकेतस्थळ जतन करा. सर्च फील्डच्या उजवीकडे शेअर बटण वर टॅप करा, त्यानंतर ’बुकमार्क्समध्ये समाविष्ट करा’ वर टॅप करा.

Safari विंडोच्या डाव्या बाजूला असलेला Safari साइडबार उघडा आहे, ज्यात ‘खाजगी’ सिलेक्ट केलेले आहे. उजवीकडे असे स्पष्टीकरण आहे की Safari तुमचे ब्राउझिंग लक्षात ठेवणार नाही.

खाजगीरित्या ब्राउझ करणे

तुमच्या ब्राउझिंग ॲक्टिव्हिटीज तुमच्यापुरत्या मर्यादित ठेवा. जेव्हा तुम्ही गोपनीय ब्राउझिंग वापरता, तेव्हा तुम्ही उघडलेले टॅब्ज iPad वर हिस्ट्रीमध्ये किंवा तुमच्या इतर डिव्हाइसेसवरील टॅब्जच्या यादीमध्ये दिसत नाहीत. ‘साइडबार दाखवा’ बटण वर टॅप करा, नंतर ‘खाजगी’ वर टॅप करा.

Safari मध्ये, वाचन यादी डावीकडे असलेल्या साइडबारमध्ये उघडलेली असते आणि वाचन यादीमध्ये जतन केलेल्या संकेतस्थळांची यादी डिस्प्ले केलेली असते. भौतिकशास्त्रातील लेख उजवीकडे दिसतो.

कुकीज काढून टाकणे आणि तुमचा कॅशे क्लिअर करणे

तुमचे स्थान वापरण्यासाठी (किंवा तुम्हाला नोटिफिकेशन्स पाठवण्यासाठी) आणि तुमची ब्राउझिंग हिस्ट्री इरेझ करण्यासाठी तुम्ही संकेतस्थळांना दिलेल्या परवानग्या पूर्ववत करण्यासाठी, कुकीज काढून टाका आणि तुमच्या iPad वरील कॅशे क्लिअर करा. ‘साइडबार दाखवा’ बटण वर टॅप करा, ’हिस्ट्री’ वर टॅप करा, अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ’क्लिअर करा’ वर टॅप करा.

नोट : Safari मध्ये तुमची ब्राउझिंग हिस्ट्री क्लिअर केल्याने तुम्ही भेट दिलेल्या संकेतस्थळांद्वारे स्वतंत्रपणे ठेवलेल्या कोणत्याही ब्राउझिंग हिस्ट्री, किंवा इतर ॲपमधील तुमची ब्राउझिंग हिस्ट्री क्लिअर केली जात नाही.

अधिक जाणून घ्यायचे आहे का?