iPad वर फोल्डरमध्ये तुमची ॲप्स व्यवस्थापित करणे
तुमच्या होम स्क्रीन पृष्ठांवर शोधणे सोपे करण्यासाठी तुम्ही तुमचे ॲप्स फोल्डरमध्ये व्यवस्थापित करू शकता.
फोल्डर तयार करणे
फोल्डर तयार करण्यासाठी, ॲप दुसऱ्या ॲपवर ड्रॅग करा, नंतर इतर ॲप फोल्डरमध्ये ड्रॅग करा.
फोल्डरमध्ये ॲपची अनेक पृष्ठे असू शकतात.
फोल्डरचे नाव बदलण्यासाठी, टच आणि होल्ड करा, ‘नाव बदला’ वर टॅप करा, नंतर नवीन नाव प्रविष्ट करा.
ॲप हलायला सुरुवात झाल्यास, ‘होम स्क्रीन बॅकग्राउंड’ वर टॅप करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
तुमचे काम झाल्यावर, ’पूर्ण’ वर टॅप करा.
नोट : होम स्क्रीनवर तुमचे ॲप व्यवस्थापित केल्याने ॲप लायब्ररी मधील ॲपच्या रचनेवर परिणाम होत नाही.
तुमच्या होम स्क्रीनवरून फोल्डर हटवणे
ॲप हलणे सुरू होईपर्यंत होम स्क्रीन बॅकग्राउंडवर टच आणि होल्ड करा.
हे उघडण्यासाठी फोल्डरवर टॅप करा, नंतर त्यातील सर्व ॲप ‘होम स्क्रीन’ वर ड्रॅग करा.
फोल्डर रिकामे असताना, ते ऑटोमॅटिकली हटवले जाते.
फोल्डरमधून ॲप होम स्क्रीनवर मूव्ह करणे
शोधणे आणि उघडणे सोपे करण्यासाठी तुम्ही ॲप फोल्डरमधून होम स्क्रीन पृष्ठावर मूव्ह करू शकता.
ॲपचा समावेश असलेल्या फोल्डरचे स्थान शोधा, नंतर ते उघडण्यासाठी ‘फोल्डर’ वर टॅप करा.
ॲप हलेपर्यंत ॲपवर टच आणि होल्ड करा.
फोल्डरमधून होम स्क्रीनवर ॲप ड्रॅग करा.