iPad वर स्टेटस आयकॉन्सचा अर्थ जाणून घेणे

स्क्रीनच्या शीर्षस्थानी स्टेटस बारमधील आयकॉन iPad बद्दल माहिती प्रदान करतात.

नोट : जर तुम्ही ’फोकस’ चालू केले, तर त्याचा आयकॉन स्टेटस बारमध्ये दिसेल.

स्टेटस आयकॉन

ह्याचा अर्थ काय होतो

Wi-Fi स्टेटस आयकॉन.

Wi-Fi. iPad ला Wi-Fi इंटरनेट कनेक्शन आहे. जितके जास्त बार, तितके कनेक्शन मजबूत. उपलब्ध नेटवर्क बघणे आणि Wi-Fi ला कनेक्ट करणे पहा.

मोबाइल सिग्नल स्ट्रेन्ग्थ स्टेटस आयकॉन (चार बार).

मोबाइल सिग्नल. iPad (Wi-Fi + Cellular मॉडेल्स) मोबाइल नेटवर्कच्या कक्षेत आहे. जर सिग्नल नसेल, तर “कोणतीही सेवा उपलब्ध नाही” असे दिसेल.

विमान मोड स्टेटस आयकॉन.

विमान मोड. विमान मोड चालू आहे. नॉनवायरलेस फीचर उपलब्ध आहेत, परंतु वायरलेस फंक्शन कदाचित डिसेबल केली जाऊ शकतात. प्रवासासाठी सेटिंग निवडा पहा.

5G स्टेटस आयकॉन.

5G. तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 5G नेटवर्क उपलब्ध आहे आणि सपोर्ट केलेली मॉडेल त्या नेटवर्कद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतात (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही). तुमच्या iPad सह 5G वापरा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

5G स्टेटस आयकॉन.

5G UC. तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 5G UC नेटवर्क उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 5G उच्च वारंवारता व्हर्जन समाविष्ट असू शकते. सपोर्ट केलेली मॉडेल त्या नेटवर्कद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतात (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही). तुमच्या iPad सह 5G वापरा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

5G+ स्टेटस आयकॉन.

5G+. तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 5G+ नेटवर्क उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 5G उच्च वारंवारता व्हर्जन समाविष्ट असू शकते. सपोर्ट केलेली मॉडेल त्या नेटवर्कद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतात (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही). तुमच्या iPad सह 5G वापरा ह्याबाबत Apple सपोर्ट लेख पहा.

5G UW स्टेटस आयकॉन.

5G UW. तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 5G UW नेटवर्क उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 5G उच्च वारंवारता व्हर्जन समाविष्ट असू शकते. सपोर्ट केलेली मॉडेल त्या नेटवर्कद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतात (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही). तुमच्या iPad सह 5G वापरा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

5G E स्टेटस आयकॉन.

5G E. तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरचे 5G E नेटवर्क उपलब्ध आहे आणि सपोर्ट केलेली मॉडेल त्या नेटवर्कवरून इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतात (सर्व देशांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये उपलब्ध नाही). मोबाइल डेटा सेटिंग बघा किंवा बदला पहा.

LTE स्टेटस आयकॉन.

LTE. iPad (Wi-Fi + Cellular मॉडेल्स) 4G LTE नेटवर्कद्वारे (सर्व देश आणि प्रदेशात उपलब्ध नाही) इंटरनेटशी कनेक्ट केलेला आहे. मोबाइल डेटा सेटिंग बघा किंवा बदला पहा.

4G स्टेटस आयकॉन.

4G. iPad (Wi-Fi + Cellular मॉडेल्स) 4G नेटवर्कद्वारे (सर्व देश आणि प्रदेशात उपलब्ध नाही) इंटरनेटशी कनेक्ट केलेला आहे. मोबाइल डेटा सेटिंग बघा किंवा बदला पहा.

3G स्टेटस आयकॉन.

3G. iPad (Wi-Fi + Cellular मॉडेल्स) 3G नेटवर्कद्वारे इंटरनेटशी कनेक्ट केलेला आहे. मोबाइल डेटा सेटिंग बघा किंवा बदला पहा.

EDGE स्टेटस आयकॉन.

EDGE. iPad (Wi-Fi + Cellular मॉडेल्स) EDGE नेटवर्कद्वारे इंटरनेटशी कनेक्ट केलेला आहे. मोबाइल डेटा सेटिंग बघा किंवा बदला पहा.

GPRS स्टेटस आयकॉन.

GPRS. iPad (Wi-Fi + Cellular मॉडेल्स) GPRS नेटवर्कद्वारे इंटरनेटशी कनेक्ट केलेला आहे. मोबाइल डेटा सेटिंग बघा किंवा बदला पहा.

वैयक्तिक हॉटस्पॉट स्टेटस आयकॉन.

वैयक्तिक हॉटस्पॉट कनेक्शन. iPad दुसऱ्या डिव्हाइसच्या वैयक्तिक हॉटस्पॉटद्वारे इंटरनेटशी कनेक्ट केलेला आहे. वैयक्तिक हॉटस्पॉट जॉइन करणे पहा.

VPN स्टेटस आयकॉन.

VPN. iPad हा VPN वापरून नेटवर्कशी कनेक्ट केलेला आहे.

नॅव्हिगेशन इंडिकेटर आयकॉन.

नॅव्हिगेशन. iPad टर्न बाय टर्न दिशानिर्देश प्रदान करत आहे. ड्रायव्हिंग दिशानिर्देश मिळवा पहा.

वैयक्तिक हॉटस्पॉट इंडिकेटर आयकॉन.

वैयक्तिक हॉटस्पॉट. iPad वैयक्तिक हॉटस्पॉट प्रदान करत आहे. वैयक्तिक हॉटस्पॉट वापरून तुमचे इंटरनेट कनेक्शन शेअर करा पहा.

कॉल इंडिकेटर आयकॉन.

फोन कॉल. iPad फोन कॉलवर आहे. तुमच्या iPad वर फोन कॉल आणि टेक्स्ट संदेशांना अनुमती देण्यासाठी iPhone वापरणे पहा.

FaceTime इंडिकेटर आयकॉन.

FaceTime iPad FaceTime कॉलवर आहे. FaceTime कॉल करा पहा.

रेकॉर्डिंग इंडिकेटर आयकॉन.

स्क्रीन रेकॉर्डिंग. iPad तुमची स्क्रीन रेकॉर्डिंग करत आहे. स्क्रीन रेकॉर्डिंग घ्या पहा.

‘कॅमेरा वापरला जात आहे’ आयकॉन.

कॅमेरा वापरला जात आहे. ॲप तुमचा कॅमेरा वापरत आहे. तुमच्या iPad वर कॅमेरा आणि मायक्रोफोनमध्ये कोणत्या ॲपना ॲक्सेस आहे हे नियंत्रित करणे पहा.

‘मायक्रोफोन वापरला जात आहे’ आयकॉन.

मायक्रोफोन वापरला जात आहे. ॲप तुमचा मायक्रोफोन वापरत आहे. तुमच्या iPad वर कॅमेरा आणि मायक्रोफोनमध्ये कोणत्या ॲपना ॲक्सेस आहे हे नियंत्रित करणे पहा.

‘सिंक होत आहे’ स्टेटस आयकॉन.

सिंक होत आहे. iPad तुमच्या संगणकासह सिंक होत आहे. तुमचा iPad इतर डिव्हाइसेससह सिंक करणे पहा.

नेटवर्क ॲक्टिव्हिटी स्टेटस आयकॉन.

नेटवर्क ॲक्टिव्हिटी. नेटवर्क किंवा इतर ॲक्टिव्हिटी आहे. काही थर्ड पार्टी ॲप्स ॲप ॲक्टिव्हिटी दाखवण्यासाठी हे आयकॉन वापरतात. इंटरनेटला कनेक्ट करा पहा

लॉक स्टेटस आयकॉन.

लॉक. iPad लॉक आहे. iPad सक्रिय करणे, अनलॉक करणे आणि लॉक करणे पहा.

‘डू नॉट डिस्टर्ब’ स्टेटस आयकॉन.

'डू नॉट डिस्टर्ब'. ‘डू नॉट डिस्टर्ब’ चालू आहे. फोकस चालू करा किंवा शेड्यूल करा पहा.

ओरिएंटेशन लॉक स्टेटस आयकॉन.

ओरिएंटेशन लॉक. स्क्रीन ओरिएंटेशन लॉक आहे. स्क्रीन ओरिएंटेशन बदला किंवा लॉक करा पहा.

स्थान सेवा स्टेटस आयकॉन.

स्थान सेवा. ॲप स्थान सेवा वापरत आहे. कोणती ॲप्स तुमच्या iPad चे स्थान वापरू शकतात हे नियंत्रित करणे पहा.

अलार्म स्टेटस आयकॉन.

अलार्म. अलार्म सेट केला आहे. गजर सेट करा पहा.

कनेक्ट केलेले हेडफोन स्टेटस आयकॉन.

हेडफोन कनेक्ट केलेले आहेत. iPad हा चालू केलेल्या Bluetooth® हेडफोनसह पेअर केलेला असून तो Bluetooth रेंजमध्ये आहेत. Bluetooth हेडफोन सेटअप करा आणि ऐका पहा.

बॅटरी स्टेटस आयकॉन.

बॅटरी. iPad ची बॅटरी पातळी दाखवते. आयकॉन पिवळा असतो तेव्हा ‘लो पॉवर’ मोड चालू असतो. iPad च्या बॅटरीची टक्केवारी दाखवणे पहा.

बॅटरी चार्जिंग आयकॉन.

बॅटरी चार्जिंग. iPad बॅटरी चार्ज होत आहे. जेव्हा आयकॉन ग्रे असतो, तेव्हा चार्जिंग पॉज केलेले असते. बॅटरी चार्ज करा पहा.

Bluetooth बॅटरी स्टेटस आयकॉन.

Bluetooth बॅटरी. सपोर्ट करणाऱ्या पेअर केलेल्या Bluetooth डिव्हाइसची बॅटरी पातळी दर्शवते. Bluetooth ॲक्सेसरीशी कनेक्ट करा पहा.

AirPlay स्टेटस आयकॉन.

AirPlay. AirPlay चालू आहे. व्हिडिओ आणि छायाचित्रे स्ट्रीम करा पहा.

व्हॉइस कंट्रोल आयकॉन.

व्हॉइस कंट्रोल. सेटिंग > ‘ॲक्सेसिबिलिटी’ मध्ये ‘व्हॉइस कंट्रोल’ चालू केलेले आहे आणि तुम्ही तुमचा आवाज वापरून iPad बरोबर संवाद साधू शकता.

RTT स्टेटस आयकॉन.

RTT. RTT चालू आहे. RTT सेट अप करा आणि वापरा पहा.