ॲप Exposé
‘ॲप Exposé’ हे तुमच्या विशिष्ट ॲपच्या उघडलेल्या सर्व विंडोजचा डिस्प्ले आहे.
‘ॲप Exposé’ उघडण्यासाठी, पुढीलपैकी कोणतेही एक करा :
Exposé उघडा आणि विंडोजपैकी एका विंडोमधील ‘ॲप आयकॉन’ वर टॅप करा.
‘होम स्क्रीन’ वर, ‘Dock’ मध्ये किंवा ‘ॲप लायब्ररी’ मध्ये ॲप्स आयकॉनवर टच आणि होल्ड करा, नंतर ‘सर्व विंडोज दाखवा’ वर टॅप करा.
उघडलेल्या ॲपमध्ये, मेन्यू बार उघडा, ‘विंडो’ मेन्यूवर टॅप करा, नंतर ‘सर्व विंडोज दाखवा’ निवडा.
अधिक ॲप पाहण्यासाठी, उजवीकडे स्वाइप करा. ॲप Exposé बंद करण्यासाठी, स्क्रीनवर टॅप करा किंवा होम बटण (होम बटणासह iPad वर) दाबा.