iPad वर नोटिफिकेशन बघणे आणि त्यांना प्रतिसाद देणे

नवीन काय आहे हे ट्रॅक करण्यासाठी नोटिफिकेशन्स तुम्हाला मदत करतात, ते तुम्हाला तुमचा कॉल मिस झाल्यास, इव्हेंटचा दिनांक बदलल्यास आणि बरेच काही कळवतात. तुम्ही तुमच्या नोटिफिकेशन कस्टमाइझ करू शकता जेणेकरून तुम्हाला केवळ तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे ते दिसेल.

नोट : तुम्ही ॲप वापरत असताना, तुम्हाला त्यावरून नोटिफिकेशन कसे प्राप्त करायचे आहेत ह्याविषयी विचारले जाऊ शकते—‘लगेच’, ‘कधीच नाही’ किंवा शेड्यूल केलेल्या सारांशमध्ये. तुम्ही नंतर सेटिंग > ‘नोटिफिकेशन’ मध्ये जाऊन ह्या सेटिंग बदलू शकता.

नोटिफिकेशन सेंटरमध्ये तुमचे नोटिफिकेशन शोधणे

जर तुम्ही फोकस किंवा डू नॉट डिस्टर्ब वापरून नोटिफिकेशन सायलेंट केल्या नसतील, तर iPad नोटिफिकेशन येताच त्या डिस्प्ले करतो. जर तुम्ही ते लगेच वाचले नाही, तर ते नोटिफिकेशन सेंटर जतन केले जाते, जेणेकरून तुम्ही ते नंतर तपासू शकाल.

नोटिफिकेशन सेंटरमध्ये तुमचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी, पुढीलपैकी कोणतेही काम करा :

  • लॉक स्क्रीनवर : स्क्रीनच्या मध्यापासून ‘वर’ स्वाइप करा.

  • इतर स्क्रीनवर : वरच्या मध्यापासून ‘खाली’ स्वाइप करा. काही जुने नोटिफिकेशन्स असल्यास, ते पाहण्यासाठी तुम्ही नंतर ‘वर’ स्क्रोल करू शकता.

नोटिफिकेशन सेंटर बंद करण्यासाठी, एका बोटाने खालून वर स्वाइप करा किंवा ‘होम बटण’ (सपोर्ट केलेल्या मॉडेलवर) दाबा.

नोटिफिकेशनला प्रतिसाद देणे

जेव्हा तुमच्या नोटिफिकेशन सेंटरमध्ये किंवा लॉक स्क्रीनवर अनेक नोटिफिकेशन असतात, तेव्हा ते ॲपनुसार गटबद्ध केले जातात, ज्यामुळे ते बघणे आणि मॅनेज करणे सोपे होते. काही ॲपमधील नोटिफिकेशन हे विषय किंवा थ्रेड ह्यासारखे फीचर व्यवस्थापित करून देखील गटबद्ध केले जाऊ शकतात. गटबद्ध केलेली नोटिफिकेशन लहान स्टॅक म्हणून दिसत असून त्यात सर्वात अलीकडील नोटिफिकेशन शीर्षस्थानी असते.

पुढीलपैकी कोणतेही एक करा :

  • नोटिफिकेशन वैयक्तिकरित्या पाहण्यासाठी त्यांचा गट विस्तारित करण्यासाठी हे करा : ‘गट’ वर टॅप करा. गट बंद करण्यासाठी, ’कमी दाखवा’ वर टॅप करा.

  • ॲप ऑफर करत असल्यास नोटिफिकेशन पाहण्यासाठी आणि त्वरित कृती करण्यासाठी : नोटिफिकेशनवर टच आणि होल्ड करा.

  • नोटिफिकेशन ॲप उघडण्यासाठी : ‘नोटिफिकेशन’ वर टॅप करा, त्यानंतर ‘उघडा’ वर टॅप करा.

  • iPad लॉक असताना नोटिफिकेशनला प्रतिसाद देण्यासाठी : नोटिफिकेशनवर टच आणि होल्ड करा.

नोटिफिकेशन सारांश शेड्यूल करणे

तुम्ही नोटिफिकेशन सारांश म्हणून शेड्यूल करून दिवसभरात लक्ष विचलित होणे कमी करू शकता—कोणते नोटिफिकेशन ‘सारांश’ मध्ये असावे आणि तुम्हाला कोणत्या वेळी ते प्राप्त व्हावे हे तुम्ही निवडू शकता.

नोटिफिकेशन सारांश तुमच्यासाठी वैयक्तिकृत केले गेले आहे आणि तुमच्या सध्याच्या ॲक्टिव्हिटीच्या आधारावर प्राधान्यानुसार हुशारीने क्रमवार लावले गेले आहेत, ज्यात सर्वाधिक संबंधित नोटिफिकेशन शीर्षस्थानी आहेत. सारांश विशेष उपयुक्त आहे कारण हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वेळेनुसार नोटिफिकेशनमध्ये पाहण्याची अनुमती देते. तुम्ही ॲक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करत असताना नोटिफिकेशन फिल्टर करण्यासाठी फोकस वापरून हे आणखी पुढे नेऊ शकता.

  1. सेटिंग  > नोटिफिकेशन > ‘सारांश शेड्यूल करा’ वर जा. नंतर ‘सारांश शेड्यूल करा’ चालू करा.

  2. तुमचा सारांश दिसण्यासाठी वेळ सेट करा. तुम्हाला दुसरा सारांश प्राप्त करायचा असल्यास, ’सारांश समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  3. तुमच्या सारांशामध्ये समाविष्ट करण्यासाठी ॲप सिलेक्ट करा.

  4. ‘सारांश’ मध्ये ‘ॲपच्या खाली A ते Z’ वर टॅप करा, नंतर तुम्हाला तुमच्या सारांशामध्ये समाविष्ट करायचे असलेले ॲप चालू असल्याची खात्री करा.

    नोट : तुम्हाला तुमच्या ‘नोटिफिकेशन सारांश’ मध्ये समाविष्ट करायचे असलेले ॲप A ते Z यादीमध्ये दिसत नसल्यास, तुम्हाला ॲपसाठी ’नोटिफिकेशना अनुमती द्या’ चालू करावे लागेल. सेटिंग > ‘नोटिफिकेशन’ वर जा, ‘ॲप’ वर टॅप करा, नंतर ‘नोटिफिकेशनला अनुमती द्या’ चालू करा. नोटिफिकेशन सेटिंग बदला पहा.

नोटिफिकेशन बघणे, काढून टाकणे, क्लिअर करणे आणि म्यूट करणे

तुमच्या iPad वर नोटिफिकेशन दिसल्यावर, पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

  • दुसरे ॲप वापरत असताना तुम्हाला प्राप्त होणारे नोटिफिकेशन हॅण्डल करा : ते पाहण्यासाठी खाली खेचा, नंतर ते डिस्मिस करण्यासाठी वर स्वाइप करा.

  • नोटिफिकेशन क्लिअर करा : ‘नोटिफिकेशन’ किंवा ‘नोटिफिकेशन गट’ वर डावीकडे स्वाइप करा, नंतर ‘क्लिअर करा’ किंवा ‘सर्व क्लिअर करा’ वर टॅप करा.

  • ॲपसाठी नोटिफिकेशन म्यूट करा : ‘नोटिफिकेशन’ किंवा ‘नोटिफिकेशन गट’ वर डावीकडे स्वाइप करा, ‘पर्याय’ वर टॅप करा, नंतर एक तास किंवा एक दिवसासाठी ॲपचे नोटिफिकेशन म्युट करण्यासाठी ‘पर्याय’ वर टॅप करा. हे त्यांना थेट नोटिफिकेशन सेंटरकडे पाठवते आणि लॉक स्क्रीनवर दिसण्यापासून, ध्वनी प्ले होण्यापासून, स्क्रीन प्रकाशित होण्यापासून किंवा बॅनर दाखवण्यापासून प्रतिबंधित करते.

    हे नोटिफिकेशन्स पुन्हा पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी, ‘नोटिफिकेशन सेंटर’ मधील नोटिफिकेशनवर डावीकडे स्वाइप करा, ‘पर्याय’ वर टॅप करा, नंतर ‘अनम्युट करा’ वर टॅप करा.

  • ॲप किंवा नोटिफिकेशन गटासाठी नोटिफिकेशन बंद करा : ‘नोटिफिकेशन’ किंवा ‘नोटिफिकेशन गट’ वर डावीकडे स्वाइप करा, ‘पर्याय’ वर टॅप करा, त्यानंतर ‘बंद करा’ वर टॅप करा.

  • ॲप नोटिफिकेशन कसे डिस्प्ले करते ते बदला : ‘नोटिफेकशन’ वर डावीकडे स्वाइप करा, ‘पर्याय’ वर टॅप करा, नंतर ’सेटिंग बघा’ वर टॅप करा. तुम्ही बदलू शकता अशा सेटिंगविषयी जाणून घेण्यासाठी नोटिफिकेशन सेटिंग बदला पहा.

  • नोटिफिकेशन सेंटरमधील तुमची सर्व नोटिफिकेशन क्लिअर करा : ’नोटिफिकेशन सेंटर’ वर जा, ‘नोटिफिकेशन क्लिअर करा’ बटण वर टॅप करा, नंतर ‘क्लिअर करा’ वर टॅप करा.

  • सर्व नोटिफिकेशन सायलेंट करा : ‘डू नॉट डिस्टर्ब’ चालू करा. Focus चालू करा किंवा शेड्यूल करा पहा.

तुम्ही बराच काळ एखादे ॲप वापरले नसल्यास, त्या ॲपसाठी नोटिफिकेशन बंद करण्याची सूचना Siri तुम्हाला देते.

लॉक स्क्रीनवर अलीकडील नोटिफिकेशन दाखवणे

तुम्ही लॉक स्क्रीनवर नोटिफिकेशन सेंटर ॲक्सेस करण्याची अनुमती देऊ शकता.

  1. सेटिंग वर जा, नंतर तुमच्या मॉडेलनुसार, पुढीलपैकी एकावर टॅप करा.

    • Face ID व पासकोड

    • Touch ID व पासकोड

    • पासकोड

  2. तुमचा पासकोड प्रविष्ट करा.

  3. नोटिफिकेशन सेंटर चालू करा (‘लॉक केल्यावर ॲक्सेसला अनुमती द्या’ च्या खाली).

Apple Intelligence सह नोटिफिकेशनचा सारांश घेणे

जर Apple Intelligence* सुरू केलेले असेल, तर तुम्ही लांब किंवा स्टॅक केलेल्या नोटिफिकेशन्सचा सारांश देण्यासाठी Apple Intelligence वापरू शकता, ज्यामुळे त्यांना एका नजरेत समजून सोपे होते. Apple Intelligence सह नोटिफिकेशन्स सारांशित करा आणि व्यत्यय कमी करा पहा.

Apple Intelligence सह प्राधान्य असलेले नोटिफिकेशन्स बघणे

जर Apple Intelligence* सुरू केलेले असेल, तर तुम्ही Apple Intelligence चा वापर करून वेळ संवेदनशील नोटिफिकेशन्सला प्राधान्य देऊ शकता, जेणेकरून तुम्ही जे काही मिस केले असेल ते तुम्ही पाहू शकता. Apple Intelligence सह नोटिफिकेशन्स सारांशित करा आणि व्यत्यय कमी करा पहा.

*Apple Intelligence बीटामध्ये पुढील भाषांच्या सपोर्टसह उपलब्ध आहे : इंग्रजी, डॅनिश, डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन, नॉर्वेजियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, स्वीडिश, तुर्की, चिनी (सरलीकृत), चिनी (पारंपारिक), जपानी, कोरियन आणि व्हिएतनामी. काही फीचर्स सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नसतील. भाषा आणि फीचर उपलब्धता आणि सिस्टीम आवश्यकतांविषयी अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.