iPad वरील फाइल ॲपमध्ये फाइल आणि फोल्डरमध्ये बदल करणे
तुम्ही iPad वर तुमची डॉक्युमेंट्स, इमेजेस, फोल्डर्स आणि इतर फाइल्स कॉपी करू शकता, मूव्ह करू शकता, कस्टमाइझ करू शकता, शेअर करू शकता आणि हटवू शकता.

डॉक्युमेंटमध्ये बदल करणे आणि ती पुन्हा व्यवस्थापित करणे
सपोर्ट असलेल्या डॉक्युमेंट फॉरमॅटमध्ये फाइल पाहताना, तुम्ही डॉक्युमेंट कॉण्टेण्टमध्ये बदल करू शकता आणि तो पुन्हा व्यवस्थापित करू शकता.
तुमच्या iPad वर फाइल ॲपवर
जा.तुम्हाला हवे असलेले डॉक्युमेंट उघडा, त्याच्या शीर्षकावर टॅप करा, नंतर पुढीलपैकी कोणताही एक पर्याय निवडा :
‘छायाचित्र’ मध्ये जतन करा : डॉक्युमेंट ’छायाचित्र’ लायब्ररीमध्ये जतन करा.
डुप्लिकेट करा : डॉक्युमेंटची प्रत बनवा.
मूव्ह करा : डॉक्युमेंट दुसऱ्या स्थानावर मूव्ह करा.
नाव बदला : डॉक्युमेंटचे नाव बदला.
एक्सपोर्ट करा : फाइलची कॉपी वेगळ्या फाइल फॉरमॅटमध्ये जतन करा.
प्रिंट करा : डॉक्युमेंट प्रिंट करा
डॉक्युमेंट चिन्हांकित करण्यासाठी,
वर टॅप करा.
डॉक्युमेंट पुन्हा व्यवस्थापित करण्यासाठी, हायलाइट केलेल्या पृष्ठाला टच आणि होल्ड करा आणि ते नवीन स्थानावर ड्रॅग करा.
नोट : ‘फाइल’ ॲपद्वारे सर्व डॉक्युमेंट फॉरमॅट सपोर्ट केले जात नाहीत.
तुमच्या फोल्डर्सची दिखावट कस्टमाइझ करणे
तुमचे फोल्डर्स सहज शोधता यावेत म्हणून तुम्ही त्यामध्ये रंग आणि आयकॉन्स समाविष्ट करू शकता.
तुमच्या iPad वर फाइल ॲपवर
जा.तुम्हाला कस्टमाइझ करायच्या असलेल्या फोल्डरवर टच आणि होल्ड करा, नंतर ‘फोल्डर व टॅग्ज कस्टमाइझ करा’ निवडा.
‘टॅग्ज’ वर टॅप करा, रंग निवडा, नंतर
वर टॅप करा.फोल्डरमध्ये इमोजी समाविष्ट करण्यासाठी आयकॉन सिलेक्ट करा किंवा इमोजीवर टॅप करा.
फोल्डरमधून आयकॉन काढून टाकण्यासाठी, आयकॉनच्या खाली असलेल्या ‘क्लिअर करा’ वर टॅप करा.
आयकॉन, यादी किंवा कॉलम व्ह्यूमध्ये बदलणे
तुम्ही iPad वरील उघडलेले स्थान किंवा फोल्डरमध्ये तुमचे फाइल व्ह्यू बदलू शकता.

तुमच्या iPad वर फाइल ॲपवर
जा.स्क्रीनच्या शीर्षस्थानी असलेल्या स्थानावर टॅप करा—‘अलीकडील’, ‘शेअर केलेले’, किंवा ‘ब्राउझ करा’—किंवा
वर टॅप करा, नंतर साइडबारमधील स्थानावर टॅप करा.
,
, किंवा
वर टॅप करा, त्यानंतर फाइल्स कशा बघायच्या ते निवडा.‘यादी’ व्ह्यूमध्ये फाइल पदानुक्रमामध्ये अधिक खोलवर बघण्यासाठी, फोल्डरच्या पुढे
वर टॅप करून ते विस्तारित करा.‘कॉलम व्ह्यू’ मध्ये फोल्डर पदानुक्रमानुसार अधिक खोलवर बघण्यासाठी, सर्वात उजव्या कॉलममधील आयटमवर टॅप करा. फाइलच्या मेटाडेटासह प्रिव्ह्यू पाहण्यासाठी (जसे की तिचा प्रकार, आकार आणि निर्मितीचा दिनांक) पाहण्यासाठी ’कॉलम व्ह्यू’ मध्ये फाइलवर टॅप करा. (प्रिव्ह्यू सर्वात उजव्या कॉलममध्ये दिसत नसल्यास, डावीकडे स्वाइप करा.) ‘फाइल’ मधून बाहेर न पडता फाइल बघण्यासाठी आणि त्यावर विविध कृती करण्यासाठी, फाइल प्रिव्ह्यूच्या खाली ‘उघडा’ वर टॅप करा.
सहज ॲक्सेससाठी फोल्डर Dock वर मूव्ह करणे
तुम्ही वारंवार ॲक्सेस करत असलेला फोल्डर शोधणे आणि उघडणे सोपे करण्यासाठी Dock वर मूव्ह करू शकता.
तुमच्या iPad वर फाइल ॲपवर
जा.मेन्यू उघडत नाही तोपर्यंत तुम्हाला मूव्ह करायचे असलेल्या ‘फोल्डर’ वर टच आणि होल्ड करा.
’मेन्यूमध्ये समाविष्ट करा’ निवडा, नंतर Dock वर टॅप करा.
फोल्डरचा विस्तार करण्यासाठी तुम्ही Dock मधील ‘फोल्डर’ वर टॅप करू शकता आणि त्यातील फाइल्स पाहू शकता. ॲपमधील फोल्डरमधून फाइल उघडण्यासाठी, फाइलला ‘Dock’ मधील ॲपमध्ये ड्रॅग करा किंवा ॲप आधीपासून उघडलेले असल्यास, थेट ॲपच्या विंडोमध्ये ड्रॅग करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही ‘संदेश’ ॲप उघडले असेल, तर तुम्ही फोल्डरमधून फाइल थेट तुम्ही उघडलेल्या संभाषणात ड्रॅग करू शकता.
साइडबार पुन्हा व्यवस्थापित करणे
तुमच्या iPad वर फाइल ॲपवर
जा.साइडबार दाखवण्यासाठी
वर टॅप करा.साइडबारच्या शीर्षस्थानी
वर टॅप करा, ‘साइडबार संपादित करा’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा :स्थान लपवा : स्थान बंद करा.
टॅग हटवा आणि तो सर्व आयटममधून काढून टाका : टॅगच्या पुढे बाजूला
वर टॅप करा. (फाइल किंवा फोल्डर टॅग करणे पहा.)‘आवडते’ यादीमधून आयटम काढून टाका : आयटमच्या बाजूला
वर टॅप करा. (फोल्डर ‘आवडते’ म्हणून चिन्हांकित करणे पहा.)आयटमचा क्रम बदला :
ला टच आणि होल्ड करा, नंतर त्याला नवीन स्थानावर ड्रॅग करा.
फाइल किंवा फोल्डर हटवणे
तुमच्या iPad वर फाइल ॲपवर
जा.तुम्हाला हटवायची असलेली फाइल किंवा फोल्डर शोधा.
आयटमवर टच आणि होल्ड करा, नंतर ‘हटवा’ वर टॅप करा.