iPad वर ॲक्सेसिबिलिटीसाठी ऑनस्क्रीन आणि बाह्य कीबोर्ड सेटिंग ॲडजस्ट करणे

तुम्ही iPad वर फक्त अप्परकेस अक्षरे दाखवण्यासाठी ऑनस्क्रीन कीबोर्ड सेट करू शकता आणि तुम्ही तुमच्या iPad सह प्रत्यक्ष कीबोर्ड वापरत असल्यास, ‘की’ संवेदनशीलता ॲडजस्ट करा आणि ‘की’ ची संयोजने दाबणे सोपे करा.

तुम्ही ऑटो करेक्शन करणे आणि टाइप करण्यासाठी स्लाइड करणे ह्यासारखे टायपिंग पर्याय सेट देखील करू शकता, आणि इतर भाषांसाठी किंवा पर्यायी लेआउटसाठी कीबोर्ड समाविष्ट करा.

केवळ अप्परकेस अक्षरे डिस्प्ले करण्यासाठी ऑनस्क्रीन कीबोर्ड सेट करणे

अप्परकेस अक्षरे वाचणे सोपे असल्यास, तुम्ही एक पर्याय सेट करू शकता ज्यामुळे ऑनस्क्रीन कीबोर्डवर लोअरकेसमधील अक्षरे डिस्प्ले होणार नाहीत.

सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > ‘कीबोर्ड’ वर जा, नंतर ‘लोअरकेस की दाखवा’ बंद करा.

टिप : ‘Mail’, ‘संदेश’, ‘नोट्स’ आणि ‘Safari’ ह्यासह अनेक ॲप्समध्ये टाइप करण्याकरिता मोठा कीबोर्ड वापरण्यासाठी iPad लॅण्डस्केप ओरिएंटेशनमध्ये रोटेट करा. स्क्रीन ओरिएंटेशन बदला किंवा लॉक करा पहा.

बाह्य कीबोर्डवर ’की’ कशा प्रकारे प्रतिसाद देतात ते बदलणे

तुम्ही iPad सह प्रत्यक्ष कीबोर्ड वापरत असल्यास, तुम्ही ‘की’ च्या संवेदनशीलता ॲडजस्ट करू शकता आणि ‘की’ ची संयोजने दाबणे सोपे करू शकता.

सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > ‘कीबोर्ड’ वर जा, नंतर पुढीलपैकी कोणत्याही कीबोर्डवर टॅप करा :

  • ’की’ रिपीट करा : ’की’ रिपीट करणे सुरू होण्याआधी तुम्हाला किती वेळ दाबावे आणि होल्ड करावे लागेल आणि ते सुरू झाल्यानंतर ती किती वेगाने रिपीट करावी हे तुम्ही सेट करू शकता. तुम्ही ’की’ ला रिपीट करण्यापासून देखील रोखू शकता.

  • स्टिकी की : जेव्हा तुम्हाला एकाच वेळी अनेक ‘की’ दाबणे गरजेचे असते, तेव्हा त्याऐवजी तुम्ही प्रत्येक ‘की’ स्वतंत्रपणे दाबू शकता. उदाहरणार्थ, कमांड दाबून, नंतर जे दाबून कीबोर्ड शॉर्टकट कमांड-Z प्रविष्ट करा.

  • स्लो की : तुम्ही ‘की’ दाबल्यावर आणि ती सक्रिय झाल्याच्या दरम्यानचा वेळ ॲडजस्ट करा.