iPad वर स्क्रिबलसह टेक्स्ट प्रविष्ट करणे

सपोर्ट करणाऱ्या मॉडेल वर, टेक्स्ट प्रविष्ट करण्यासाठी तुम्ही Apple Pencil (स्वतंत्रपणे विकली जाणारी) आणि स्क्रिबल वापरू शकता. ऑनस्क्रीन कीबोर्ड न उघडता किंवा न वापरता, तुम्ही संदेशाला त्वरित उत्तर देऊ शकता, स्वतःसाठी रिमाइंडर लिहू शकता आणि बरेच काही करू शकता. स्क्रिबल तुमच्या हस्तलेखनाला तुमच्या iPad वर थेट टेक्स्टमध्ये रूपांतरित करते, जेणेकरून तुमचे लेखन गोपनीय राहते.

नोट : स्क्रिबल अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ पहा.

कोणत्याही टेक्स्ट फिल्डमध्ये टेक्स्ट प्रविष्ट करण्यासाठी Apple Pencil वापरा

  1. कोणत्याही टेक्स्ट फील्डमध्ये Apple Pencil सह लिहा आणि स्क्रिबल ऑटोमॅटिकली तुमच्या हस्ताक्षराला टाइप केलेल्या टेक्स्टमध्ये रूपांतरित करते.

    तुमचे हस्तलेखन टेक्स्ट फील्डच्या कडांच्या बाहेर गेले असते तेव्हाही स्क्रिबल काम करते.

  2. कृती शॉर्टकट वापरण्यासाठी, स्क्रिबल टूलबारवर टॅप करा.

    उपलब्ध क्रिया तुम्ही वापरत असलेल्या ॲपवर अवलंबून असतात आणि त्यात ’पूर्ववत करा’ बटण , ’कीबोर्ड दाखवा’ बटण आणि बरेच काही समाविष्ट असू शकते.

    तुम्ही टेक्स्ट प्रविष्ट करत असताना टूलबार ऑटोमॅटिकली कमी करण्यासाठी, एलिप्सिस बटण वर टॅप करा, त्यानंतर ऑटो-मिनिमाइझ चालू करा. पूर्ण टूलबार दाखवण्यासाठी, मिनिमाइझ केलेल्या व्हर्जनवर टॅप करा.

नोट्स आणि Freeform मध्ये टेक्स्ट प्रविष्ट करण्यासाठी Apple Pencil वापरा

  1. नोट्स किंवा Freeform मध्ये, टूल पॅलेट दाखवण्यासाठी मार्कअप स्विच बटण ऑफ वर टॅप करा.

  2. टूल पॅलेटमध्ये, ‘हस्तलेखन’ टूल वर टॅप करा (पेनच्या डाव्या बाजूला).

  3. Apple Pencil सह लिहा आणि स्क्रिबल ऑटोमॅटिकली तुमच्या हस्ताक्षराला टाइप केलेल्या टेक्स्टमध्ये रूपांतरित करते.

Apple Pensil सह टेक्स्ट सिलेक्ट करणे आणि सुधारित करणे

जेव्हा तुम्ही Apple Pencil आणि स्क्रिबल वापरून टेक्स्ट प्रविष्ट करता, तेव्हा तुम्ही पुढील गोष्टी करू शकता :

  • एखादा शब्द हटवणे : हे खोडा.

  • टेक्स्ट इन्सर्ट करा : टेक्स्ट क्षेत्रामध्ये टच आणि होल्ड करा, त्यानंतर उघडलेल्या स्पेसमध्ये लिहा.

  • वर्ण जोडणे किंवा वेगळे करणे : त्यांच्यामध्ये उभी रेषा काढा.

  • टेक्स्ट सिलेक्ट करा : टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी आणि संपादन पर्याय पाहण्यासाठी त्याभोवती वर्तुळ काढा किंवा त्याला अधोरेखित करा. सिलेक्शन बदलण्यासाठी, सिलेक्ट केलेल्या टेक्स्टच्या सुरुवातीपासून किंवा शेवटपर्यंत ड्रॅग करा.

  • शब्द सिलेक्ट करा : शब्दावर डबल टॅप करा.

  • परिच्छेद सिलेक्ट करा : परिच्छेदातल्या शब्दावर ट्रिपल टॅप करा किंवा परिच्छेदाच्या वर Apple Pencil ड्रॅग करा.

तुमचे हस्ताक्षर टेक्स्टमध्ये रूपांतरित करणे थांबवणे

सेटिंग  > ‘Apple Pencil’ वर जा, नंतर स्क्रिबल बंद करा.