iPad वर अनेक दिनदर्शिका सेट करणे
दिनदर्शिका ॲपमध्ये, तुम्ही वेगवेगळ्या इव्हेंटचा ट्रॅक ठेवण्यासाठी अनेक दिनदर्शिका सेट अप करू शकता. तुम्ही तुमचे सर्व इव्हेंट आणि अपॉइंटमेंटचा ट्रॅक एकाच दिनदर्शिकेमध्ये ठेवू शकता, परंतु अतिरिक्त दिनदर्शिका सेट अप करणे सोपे आहे आणि व्यवस्थापित राहण्याचा उत्तम मार्ग आहे.

दिनदर्शिका सेट अप करणे
तुमच्या iPad वर दिनदर्शिका ॲपवर
जा.वरच्या डाव्या बाजूला
वर टॅप करा, नंतर स्क्रीनच्या तळाशी ’दिनदर्शिका समाविष्ट करा’ वर टॅप करा.पुढीलपैकी कोणतेही एक करा :
iCloud दिनदर्शिका तयार करा : ’दिनदर्शिका समाविष्ट करा’ वर टॅप करा, दिनदर्शिकेसाठी नाव प्रविष्ट करा, नंतर त्यासाठी रंग निवडा.
बाह्य, केवळ वाचण्यायोग्य दिनदर्शिकेची सदस्यता घ्या : ‘सदस्यता दिनदर्शिका समाविष्ट करा’ वर टॅप करा, तुम्हाला सदस्यता घ्यायची असलेल्या .ics फाइलची URL प्रविष्ट करा (आणि इतर आवश्यक सर्व्हरची माहिती), नंतर ‘शोधा’ वर टॅप करा.
सुट्टीची दिनदर्शिका समाविष्ट करा : ‘सुट्टीची दिनदर्शिका समाविष्ट करा’ वर टॅप करा, तुम्हाला ज्या सुट्टीच्या दिनदर्शिकेची सदस्यता घ्यायची आहे त्यावर टॅप करा.
तुम्ही iCalender (.ics) दिनदर्शिकेच्या लिंकवर टॅप करून त्याची सदस्यता देखील घेऊ शकता.
दिनदर्शिकेतून सदस्यता रद्द करणे
सदस्यता घेतलेल्या दिनदर्शिकेची सदस्यता तुम्ही रद्द करू शकता. जेव्हा तुम्ही सदस्यता रद्द करता, तेव्हा तुम्ही दिनदर्शिका जंक म्हणून देखील रिपोर्ट करू शकता.
तुमच्या iPad वर दिनदर्शिका ॲपवर
जा.वरच्या डाव्या बाजूला
वर टॅप करा, नंतर तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या दिनदर्शिकेच्या पुढे
वर टॅप करा.‘सदस्यता रद्द करा’ वर टॅप करा, नंतर ‘सदस्यता रद्द करा’ किंवा ‘सदस्यता रद्द करा आणि जंक रिपोर्ट करा’ वर टॅप करा.
नोट : जेव्हा तुम्ही ‘सदस्यता रद्द करा आणि जंक रिपोर्ट करा’ वर टॅप करता, तेव्हा दिनदर्शिकेवर संशयास्पद जंक सदस्यता म्हणून Apple ला रिपोर्ट केले जाते.
एकाच वेळी अनेक दिनदर्शिका पहाणे
तुमच्या iPad वर दिनदर्शिका ॲपवर
जा.अनेक दिनदर्शिका बघण्यासाठी,
वर टॅप करा, नंतर पुढीलपैकी कोणतेही काम करा :तुम्हाला बघायच्या असलेल्या दिनदर्शिका सिलेक्ट करा.
तुमच्या इव्हेंटसह राष्ट्रीय सुट्ट्या समाविष्ट करण्यासाठी ‘यूएस सुट्टी’ वर टॅप करा.
तुमच्या इव्हेंटसह ‘संपर्क’ मधून वाढदिवस समाविष्ट करण्यासाठी ‘वाढदिवस’ वर टॅप करा.
दिनदर्शिका इव्हेंट अलर्ट चालू करणे
तुम्ही तयार केलेल्या किंवा सदस्यता घेतलेल्या दिनदर्शिकेचे तुम्ही इव्हेंट नोटिफिकेशन चालू करू शकता.
तुमच्या iPad वर दिनदर्शिका ॲपवर
जा.शीर्षस्थानी डाव्या बाजूला
वर टॅप करा.दिनदर्शिकेच्या पुढे
वर टॅप करा.इव्हेंट अलर्ट चालू किंवा बंद करा.
वर टॅप करा.
दिनदर्शिकेचा रंग बदलणे
तुमच्या iPad वर दिनदर्शिका ॲपवर
जा.शीर्षस्थानी डाव्या बाजूला
वर टॅप करा.दिनदर्शिकेच्या पुढे
वर टॅप करा, नंतर रंग निवडा.
वर टॅप करा.
Google सारख्या काही दिनदर्शिका अकाउंटसाठी, रंग सर्व्हरद्वारे सेट केला जातो.
इव्हेंट दुसऱ्या दिनदर्शिकेवर मूव्ह करणे
तुमच्या iPad वर दिनदर्शिका ॲपवर
जा.‘इव्हेंट’ वर टॅप करा, ‘दिनदर्शिका’ वर टॅप करा, नंतर इव्हेंट मूव्ह करण्यासाठी दिनदर्शिका सिलेक्ट करा.