iPad ला माउस कनेक्ट करणे

तुम्ही तुमच्या iPad ला Magic Mouse, दुसरा Bluetooth® माउस, किंवा USB माउस कनेक्ट करू शकता.

नोट : माउस डिव्हाइस स्वतंत्रपणे विकले जातात. iPad च्या सर्व मॉडेलशी सर्व माउस डिव्हाइसेस पूर्णपणे सुसंगत नाहीत.

Magic Mouse किंवा इतर Bluetooth माउस पेअर करणे

  1. Magic Mouse साठी, माउस चालू आणि चार्ज असल्याची खात्री करा.

    कोणत्याही इतर Bluetooth माउससाठी, त्याला ‘शोध’ मोडमध्ये ठेवण्यासाठी माउसबरोबर आलेल्या सूचनांचे पालन करा.

  2. iPad वर, सेटिंग  > 'Bluetooth' वर जा, नंतर 'Bluetooth' चालू करा.

  3. ‘इतर डिव्हाइस यादी’ मध्ये दिसल्यावर डिव्हाइस सिलेक्ट करा.

    Magic Mouse पेअर करताना तुमच्याकडे PIN मागितला गेल्यास, “0000” टाइप करा (चार शून्य), नंतर ‘पेअर करा’ वर टॅप करा.

नोट : जर माउस तुमच्या Mac किंवा दुसऱ्या iPad सह आधीच पेअर केलेले असेल, तर तुमच्या iPad ला माउस कनेक्ट करण्यापूर्वी तुम्ही त्यांना अनपेअर करणे आवश्यक आहे. खालीलपैकी एक करा :

  • iPhone किंवा iPad वर : Bluetooth ॲक्सेसरी अनपेअर करणे पहा.

  • macOS 13 किंवा नंतरच्या व्हर्जनवर : Apple मेन्यू > ‘सिस्टीम सेटिंग’ निवडा, साइडबारमध्ये 'Bluetooth' वर क्लिक करा, डिव्हाइसवर ‘कंट्रोल क्लिक’ करा, नंतर ‘विसरा’ निवडा.

  • macOS 12.5 किंवा त्या आधीच्या व्हर्जनवर : Apple मेन्यू > ‘सिस्टीम प्राधान्ये’ निवडा, Bluetooth वर क्लिक करा, डिव्हाइसवर ‘कंट्रोल क्लिक’ करा, नंतर ‘काढून टाका’ वर क्लिक करा.

Bluetooth माउस iPad ला पुन्हा कनेक्ट करणे

जेव्हा तुम्ही माउसचा स्विच बंद करता किंवा जेव्हा तुम्ही माउस किंवा iPad ला Bluetooth रेंजच्या बाहेर—जवळपास 33 फूट (10 मीटर) मूव्ह करता तेव्हा माउस डिस्कनेक्ट होतो.

पुन्हा कनेक्ट करण्यासाठी, माउस स्विच चालू करा किंवा माउस आणि iPad परत रेंजमध्ये आणा, नंतर माउस क्लिक करा.

USB माऊस कनेक्ट करणे

योग्य केबल किंवा अडॅप्टर वापरून, तुम्ही USB आणि USB आधारित रिसिव्हर वापरून iPad सह विविध थर्ड पार्टी माउस डिव्हाइसेस कनेक्ट करू शकता. डिव्हाइस उत्पादकच्या सूचनांचा संदर्भ घ्या.