iPad वर स्क्रीनशॉट घ्या
तुम्हाला तुमच्या iPad स्क्रीनवर जे दिसते, ते कालांतराने पुन्हा पाहण्यासाठी, इतरांबरोबर शेअर करण्यासाठी किंवा डॉक्युमेंटमध्ये अटॅच करण्यासाठी त्याचे छायाचित्र घ्या.
स्क्रीनशॉट घेणे
एकाच वेळी शीर्ष बटण आणि दोन्हीपैकी एक व्हॉल्यूम बटण त्वरित दाबा आणि सोडा.
स्क्रीनशॉटचे थंबनेल तुमच्या स्क्रीनच्या खालच्या डाव्या कोपऱ्यात तात्पुरते दिसून येते.
स्क्रीनशॉट पाहण्यासाठी थंबनेलवर टॅप करा किंवा तो डिस्मिस करण्यासाठी डावीकडे स्वाइप करा.
स्क्रीनशॉट छायाचित्र ॲपमध्ये तुमच्या छायाचित्र लायब्ररीमध्ये ऑटोमॅटिकली जतन केले जातात. तुमचे सर्व स्क्रीनशॉट एकाच ठिकाणी पाहण्यासाठी, ‘छायाचित्र’ उघडा, त्यानंतर ‘छायाचित्र’ साइडबारमधील ‘मीडिया प्रकार’ च्या खाली ‘स्क्रीनशॉट’ वर टॅप करा.
होम बटण असलेल्या iPad चा स्क्रीनशॉट घेणे
एकाच वेळी शीर्ष बटण आणि होम बटण त्वरित दाबा आणि सोडा.
स्क्रीनशॉटचे थंबनेल तुमच्या स्क्रीनच्या खालच्या डाव्या कोपऱ्यात तात्पुरते दिसून येते.
स्क्रीनशॉट पाहण्यासाठी थंबनेलवर टॅप करा किंवा तो डिस्मिस करण्यासाठी डावीकडे स्वाइप करा.
स्क्रीनशॉट छायाचित्र ॲपमध्ये तुमच्या छायाचित्र लायब्ररीमध्ये ऑटोमॅटिकली जतन केले जातात. तुमचे सर्व स्क्रीनशॉट एकाच ठिकाणी पाहण्यासाठी, ‘छायाचित्र’ उघडा, त्यानंतर ‘छायाचित्र’ साइडबारमधील ‘मीडिया प्रकार’ च्या खाली ‘स्क्रीनशॉट’ वर टॅप करा.
पूर्ण पृष्ठ स्क्रीनशॉट घेणे
तुमच्या iPad स्क्रीनच्या लांबीच्या बाहेर जाणाऱ्या, म्हणजेच, Safari मधील संपूर्ण वेबपृष्ठ ह्यासारख्या कॉण्टेण्टचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता.
पुढीलपैकी कोणतेही एक करा :
iPad वर Face ID सह : एकाच वेळी शीर्ष बटण आणि दोन्हीपैकी एक व्हॉल्यूम बटण त्वरित दाबा आणि सोडा.
iPad वर होम बटणासह : एकाच वेळी शीर्ष बटण आणि होम बटण त्वरित दाबा आणि सोडा.
स्क्रीनच्या खालील डाव्या कोपऱ्यातील ‘स्क्रीनशॉट थंबनेल’ वर टॅप करा.
‘पूर्ण पृष्ठ’ वर टॅप करा, ‘पूर्ण’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी एक करा :
तुमच्या ‘छायाचित्र’ लायब्ररीमध्ये स्क्रीनशॉट जतन करण्यासाठी ‘’छायाचित्र’ मध्ये जतन करा’ वर टॅप करा.
‘फाइलमध्ये PDF जतन करा’ वर टॅप करा, स्थान निवडा, त्यानंतर फाइल ॲपमध्ये स्क्रीनशॉट जतन करण्यासाठी ‘जतन करा’ वर टॅप करा.