iPad वर ॲप्समध्ये आणि वेबवर Apple Pay वापरणे

तुम्ही ॲप्समध्ये, ‘ॲप क्लिप्स’ मध्ये आणि वेबवर, जिथे तुम्हाला Apple Pay बटण दिसेल तिथे Apple Pay चा वापर करून खरेदी करू शकता.

नोट : Apple Pay आणि त्याचे फीचर्स सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाहीत. Apple Pay ला सपोर्ट करणारे देश आणि प्रदेश ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

सिलेक्ट केलेल्या आयटमच्या किंमतीसह शॉपिंग कार्ट दाखवणारे Safari मधील वेबपृष्ठ. Apple Pay बटण तळाशी उजवीकडे आहे.

ॲप्स, ॲप Clips किंवा Safari मध्ये पैसे भरणे

  1. चेकआउटच्या दरम्यान, Apple Pay बटणावर टॅप करा.

  2. पेमेंटची माहिती रिव्ह्यू करा आणि पुढीलपैकी कोणतेही एक सेट करा :

    • पेमेंट पद्धत

      तुम्ही वेगळे पेमेंट कार्ड निवडू शकता; तुम्ही रिवॉर्ड्स किंवा हप्त्यांसह (विशिष्ट मार्केटमधील सहभागी बॅंका आणि कार्ड प्रदात्यांद्वारे कार्डवर उपलब्ध; पात्रता आणि मान्यतेच्या अधीन) देखील पेमेंट करू शकता.

    • बिलिंग आणि शिपिंग ॲड्रेस

    • संपर्क माहिती

      टिप : तुम्ही iCloud+ ची सदस्यता घेतल्यास, तुमचा खरा ईमेल ॲड्रेस गोपनीय ठेवण्यासाठी तुम्ही ‘माझे ईमेल लपवा’ वापरू शकता.

  3. पेमेंट पूर्ण करण्यासाठी Face ID, Touch ID किंवा तुमच्या पासकोडद्वारे ऑथेंटिकेट करा.

Apple Pay वापरून रिवॉर्डसह पैसे भरा आणि Apple Pay वापरून हप्त्यांसह पैसे भरा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

Mac, Window डिव्हाइसेस आणि इतर डिव्हाइसेसवर थर्ड पार्टी ब्राउझरमध्ये Apple Pay वापरणे

जेव्हा तुम्ही सपोर्ट करणाऱ्या थर्ड पार्टी वेब ब्राउझरमध्ये खरेदी करता, तेव्हा तुम्ही तुमच्या iPad वर पेमेंट माहितीचा वापर करून Apple Pay ने खरेदी पूर्ण करू शकता. (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही.)

  1. चेकआउटच्या वेळी, ‘Apple Pay’ वर क्लिक करा, त्यानंतर तुमचा iPad कॅमेरा वापरून कोड स्कॅन करा.

  2. तुमच्या iPad वर, पेमेंटची माहिती रिव्ह्यू करा आणि पुढीलपैकी कोणतेही एक सेट करा :

    • पेमेंट पद्धत

    • बिलिंग आणि शिपिंग ॲड्रेस

    • संपर्क माहिती

  3. पेमेंट पूर्ण करण्यासाठी Face ID, Touch ID किंवा तुमच्या पासकोडद्वारे ऑथेंटिकेट करा.

आधी अधिकृत केलेले पेमेंट्स बघणे

तुम्ही भविष्यातील Apple Pay सह आधी अधिकृत केलेले पेमेंट्स आणि सदस्यतांसारखे रिकरिंग शुल्क पाहू शकता.

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ’वॉलेट व Apple Pay’ वर टॅप करा, त्यानंतर ’आधी अधिकृत केलेली पेमेंट्स’ वर टॅप करा.

  3. तपशील पाहण्यासाठी पेमेंटवर टॅप करा.

  4. तुमची सेवा रद्द करण्यासाठी किंवा पेमेंट पद्धती मॅनेज करण्यासाठी, थेट मर्चंटशी संपर्क साधा. (सहभागी व्यापाऱ्यांसाठी, ’मॅनेज करा’ वर टॅप करा.)

  5. मर्चंटला तुमचे कार्ड ऑटोमॅटिकली चार्ज करण्यापासून रोखण्यासाठी, ’पेमेंट अधिकृतता रद्द करा’ वर टॅप करा.

    नोट : पेमेंट अधिकृतता रद्द केल्याने तुमची सेवा रद्द केली जात नाही.