Apple Creator Studio बद्दल

Apple Creator Studio ची सदस्यता कशी घ्यावी, कोणती ॲप्स समाविष्ट आहेत, सिस्टीमच्या आवश्यकता आणि आणखी बरेच काही जाणून घ्या.

Apple Creator Studio हा सर्जनशीलता आणि उत्पादनक्षमता यांसंबंधित Apple च्या अ‍ॅप्सचा संग्रह असून, यामध्ये Final Cut Pro, Logic Pro, Pixelmator Pro, Motion, Compressor आणि MainStage यांचा समावेश आहे. सदस्यत्वामध्ये Pages, Numbers, Keynote आणि Freeform या ॲप्समधील प्रीमियम आशयाचादेखील समावेश आहे.*

Apple Creator Studio च्या फीचर्सचे अवलोकन मिळवा

Apple Creator Studio डाउनलोड करा

पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • Mac 12.0 साठी Final Cut Pro

  • iPad 3.0 साठी Final Cut Pro

  • Mac 12.0 साठी Logic Pro

  • iPad 3.0 साठी Logic Pro

  • Mac 4.0 साठी Pixelmator Pro

  • iPad 4.0 साठी Pixelmator Pro

  • Motion 6.0 (Mac)

  • Compressor 5.0 (Mac)

  • MainStage 4.0 (Mac)

  • Pages 15.1 (Mac, iPad आणि iPhone)

  • Numbers 15.1 (Mac, iPad आणि iPhone)

  • Keynote 15.1 (Mac, iPad आणि iPhone)

Apple Creator Studio ची सदस्यता घ्या

तुम्ही पहिल्यांदा Apple Creator Studio ॲप उघडता, तेव्हा एका महिन्याच्या विनामूल्य चाचणीसाठी साइन अप करू शकता आणि मासिक किंवा वार्षिक सदस्यत्व निवडू शकता.

  1. Apple Creator Studio ॲप्सपैकी एक उघडा, पुढे सुरू ठेवा वर क्लिक किंवा टॅप करा आणि त्यानंतर स्क्रीनवरील सर्व सूचना फॉलो करा. Pages, Numbers किंवा Keynote साठी, तुम्ही ॲपमध्ये प्रीमियम आशय किंवा फीचर्स यांच्याशी संवाद साधताना सदस्यता घेऊ शकता.

  2. विनामूल्य चाचणी स्वीकारा (किंवा दुसरा उपलब्ध पर्याय) वर क्लिक किंवा टॅप करा, त्यानंतर तुमचे Apple खाते वापरून सदस्यता घेण्यासाठी स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

  3. सुरुवात करण्यासाठी, Apple Creator Studio अ‍ॅपमध्ये नवीन प्रोजेक्ट किंवा डॉक्युमेंट तयार करा किंवा आधीचा प्रोजेक्ट किंवा डॉक्युमेंट उघडा.

तुम्ही आधीपासून Final Cut Pro iPad किंवा Logic Pro for iPad ची सदस्यता घेतली असल्यास, दुसरे Apple Creator Studio ॲप डाउनलोड करून उघडा आणि त्यानंतर त्या ॲपमधून सदस्यता घ्या.

अ‍ॅप्स स्वतंत्रपणे खरेदी करा

Final Cut Pro, Motion, Compressor, Logic Pro, MainStage आणि Pixelmator Pro ही अ‍ॅप्स Mac साठी App Store वर एक वेळची खरेदी म्हणूनदेखील उपलब्ध आहेत. तुम्ही यापूर्वी या ॲप्सपैकी एक खरेदी केले असल्यास आणि तुमच्याकडे Apple Creator Studio चे सदस्यत्वदेखील असल्यास, तुम्ही ॲप्सच्या दोन्ही आवृत्त्या वापरू शकता. तुम्ही तुमच्या Mac वर या अ‍ॅप्सच्या दोन्ही आवृत्त्या इन्स्टॉल करू शकता. या आवृत्त्यांमधील फरक सहज ओळखता यावा, यासाठी Apple Creator Studio मधील ॲप्सना युनिक आयकन असतात.

Apple Creator Studio तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा

तुम्ही फॅमिली शेअरिंगमध्ये नोंदणी करता, तेव्हा तुम्ही आणि कुटुंबातील इतर कमाल पाच सदस्य Apple Creator Studio च्या सदस्यत्वाचा ॲक्सेस शेअर करू शकता. Apple Creator Studio चे मासिक किंवा वार्षिक सदस्यत्व शेअर करण्यासाठी, ते सदस्यत्व फॅमिली शेअरिंग > सदस्यत्व शेअरिंग अंतर्गत दिसत आहे आणि सक्रिय आहे याची खात्री करा.

तुम्ही एक वेळची खरेदी असलेले ॲपदेखील शेअर करू शकता.

तुमच्या कुटुंबासोबत अ‍ॅप्स आणि खरेदी शेअर करण्याबद्दल अधिक जाणून घ्या

उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सदस्यत्वांसाठी कुटुंब शेअरिंग उपलब्ध नाही.

Apple Creator Studio साठी सिस्टीमच्या आवश्यकता

संपूर्ण Apple Creator Studio कार्यक्षमता macOS 26, iPadOS 26 आणि iOS 26 यांसोबत उपलब्ध आहे. Apple Creator Studio हे App Store मध्ये उपलब्ध असून, त्यासाठी Apple खाते आवश्यक आहे. फीचर्स बदलू शकतात आणि काही फीचर्ससाठी इंटरनेटची आवश्यकता असू शकते. अतिरिक्त शुल्क आणि अटी लागू होऊ शकतात.

प्रत्येक Apple Creator Studio अ‍ॅपसाठी सिस्टीमच्या किमान आवश्यकता पुढीलप्रमाणे आहेत:

  • सर्व Mac ॲप्ससाठी macOS 15.6 किंवा त्यापुढील आवृत्ती आवश्यक असून, फक्त Pixelmator Pro करिता macOS 26 किंवा त्यापुढील आवृत्ती आवश्यक आहे.

  • Final Cut Pro:

    • Mac वरील Final Cut Pro साठी macOS 15.6 किंवा त्यापुढील आवृत्ती आवश्यक आहे.

    • iPad साठीच्या Final Cut Pro साठी iPadOS 18.6 किंवा त्यापुढील आवृत्ती आणि iPad, iPad Pro किंवा Apple M1 किंवा त्यापुढील आवृत्तीची चिप असलेला iPad Air, iPad (A16) किंवा iPad mini (A17 Pro) आवश्यक आहे.

  • Logic Pro:

    • Mac साठी Logic Pro करिता macOS 15.6 किंवा त्यापुढील आवृत्ती आणि Apple silicon असलेला Mac आवश्यक आहे.

    • iPad साठी Logic Pro करिता iPadOS 26 किंवा त्यापुढील आवृत्ती आणि Apple A12 Bionic किंवा त्यापुढील आवृत्तीची चिप असलेला iPad आवश्यक आहे. काही फीचर्ससाठी Apple A17 Pro किंवा त्यापुढील आवृत्तीची चिप आवश्यक आहे.

  • Pixelmator Pro:

    • Mac साठी Pixelmator Pro करिता macOS 26 किंवा त्यापुढील आवृत्ती आवश्यक आहे.

    • iPad साठी Pixelmator Pro करिता iPadOS 26 किंवा त्यापुढील आवृत्ती आणि iPad, iPad Pro किंवा Apple M1 किंवा त्यापुढील आवृत्तीची चिप असलेला iPad, iPad Pro, iPad (A16) किंवा iPad mini (A17 Pro) आवश्यक आहे.

  • Pages, Numbers आणि Keynote:

    • Mac वरील Pages, Numbers आणि Keynote साठी macOS 15.6 किंवा त्यापुढील आवृत्ती आवश्यक आहे.

    • iPad, iPhone आणि Apple Vision Pro वरील Pages, Numbers आणि Keynote साठी iPadOS 18 किंवा त्यापुढील आवृत्ती, iOS 18 किंवा त्यापुढील आवृत्ती आणि visionOS 2 किंवा त्यापुढील आवृत्ती आवश्यक आहे.

    • काही प्रीमियम फीचर्ससाठी macOS 26, iPadOS 26, iOS 26 किंवा visionOS 26 किंवा त्यापुढील आवृत्ती आवश्यक आहे.

  • Motion साठी macOS 15.6 किंवा त्यापुढील आवृत्ती आवश्यक आहे.

  • Compressor साठी macOS 15.6 किंवा त्यापुढील आवृत्ती आवश्यक आहे. काही फीचर्ससाठी Apple silicon असलेला Mac आवश्यक आहे.

  • MainStage साठी macOS 15.6 किंवा त्यापुढील आवृत्ती आणि Apple silicon असलेला Mac आवश्यक आहे.

अधिक जाणून घ्या

Apple Creator Studio बद्दल अधिक जाणून घ्या

* Freeform मधील प्रीमियम आशयाचा आणि फीचर्सचा या वर्षाच्या शेवटी Apple Creator Studio च्या सदस्यत्वामध्ये समावेश केला जाईल अशी अपेक्षा आहे.

प्रकाशनाची तारीख: