आपले AirPods आणि AirPods Pro कसे रीसेट करावेत
आपले AirPods चार्ज होत नसल्यास, आपल्याला ते रीसेट करावे लागू शकतात किंवा वेगळ्या समस्येचे निराकरण करावे लागू शकते.
आपले AirPods 1, AirPods 2, AirPods 3, AirPods Pro 1, किंवा AirPods Pro 2 रीसेट करा
आपले AirPods त्यांच्या चार्जिंग केसमध्ये ठेवा, झाकण बंद करा आणि 30 सेकंद वाट पहा.
आपल्या AirPods सोबत पेअर केलेल्या iPhone वर किंवा iPad वर, सेटिंग्ज > ब्लूटूथ वर जा:
आपले AirPods माझी डिव्हाइस सूचीमध्ये दिसल्यास, आपल्या AirPods च्या शेजारी असलेल्या अधिक माहिती बटण यावर टॅप करा, हे डिव्हाइस विसरा वर टॅप करा, त्यानंतर कन्फर्म करण्यासाठी पुन्हा टॅप करा.
आपले AirPods सूचीमध्ये दिसत नसल्यास, पुढील पायरीवर जा.
आपल्या चार्जिंग केसचे झाकण उघडा.
केसच्या मागील बाजूस असलेले सेटअप बटण साधारण 15 सेकंदांसाठी प्रेस करून धरून ठेवा.
केसच्या समोरच्या बाजूला असलेला स्टेटस लाइट अँबर रंगात चमकतो, त्यानंतर पांढऱ्या रंगात चमकतो, तेव्हा आपण आपले AirPods पुन्हा कनेक्ट करण्यासाठी डिव्हाइसच्या स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करू शकता.
आपले AirPods 4 (सर्व मॉडेल) किंवा AirPods Pro 3 रीसेट करा
आपले AirPods त्यांच्या चार्जिंग केसमध्ये ठेवा, झाकण बंद करा आणि 30 सेकंद वाट पहा.
आपल्या AirPods सोबत पेअर केलेल्या iPhone वर किंवा iPad वर, सेटिंग्ज > ब्लूटूथ वर जा:
आपले AirPods माझी डिव्हाइस सूचीमध्ये दिसल्यास, आपल्या AirPods च्या शेजारी असलेल्या अधिक माहिती बटण यावर टॅप करा, हे डिव्हाइस विसरा वर टॅप करा, नंतर कन्फर्म करण्यासाठी पुन्हा टॅप करा.
आपले AirPods सूचीमध्ये दिसत नसल्यास, पुढील पायरीवर जा.
आपल्या चार्जिंग केसचे झाकण उघडा.
स्टेटस लाइट सुरू असताना केसच्या पुढील बाजूस दोनदा टॅप करा.
स्टेटस लाइट पांढऱ्या रंगात चमकल्यावर पुन्हा दोनदा टॅप करा.
स्टेटस लाइट जलद चमकल्यावर तिसऱ्यांदा दोनदा टॅप करा.
स्टेटस लाइट अँबर रंगात चमकल्यावर, त्यानंतर पांढऱ्या रंगात चमकल्यावर, आपण आपले AirPods पुन्हा कनेक्ट करण्यासाठी डिव्हाइसच्या स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करू शकता.
आपण आपले AirPods रीसेट केल्यावर स्टेटस लाइट पांढऱ्या रंगात चमकत नसल्यास
आपले AirPods चार्जिंग केसमध्ये ठेवा आणि झाकण 20 सेकंदांसाठी बंद करा.
आपल्या चार्जिंग केसचे झाकण उघडा.
आपल्या AirPods च्या मॉडेलनुसार:
AirPods 1, AirPods 2, AirPods 3, AirPods Pro 1 किंवा AirPods Pro 2 साठी, केसच्या समोरील स्टेटस लाइट अँबर रंगात, त्यानंतर पांढऱ्या रंगात चमकत नाही, तोपर्यंत केसवरील सेटअप बटण पुन्हा सुमारे 15 सेकंद प्रेस करून धरून ठेवा.
AirPods 4 मॉडेल आणि AirPods Pro 3 साठी, स्टेटस लाइट सुरू असताना केसच्या समोरील बाजूस दोनदा टॅप करा, स्टेटस लाइट पांढऱ्या रंगात चमकल्यावर पुन्हा दोनदा टॅप करा. स्टेटस लाइट जलद चमकतो, तेव्हा स्टेटस लाइट पिवळ्या रंगात, त्यानंतर पांढऱ्या रंगात चमकत नाही, तोपर्यंत तिसऱ्यांदा दोनदा टॅप करा.
आपले AirPods पुन्हा कनेक्ट करण्यासाठी: आपले AirPods त्यांच्या चार्जिंग केसमध्ये असताना आणि त्याचे झाकण उघडे असताना, आपले AirPods आपल्या डिव्हाइसजवळ ठेवा, नंतर आपल्या डिव्हाइसच्या स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.
अधिक जाणून घ्या
आपले रिप्लेसमेंट AirPods किंवा चार्जिंग केस सेट करा