तुमच्या iPhone किंवा iPad वर Wi-Fi शी कनेक्ट करा
तुमचे डिव्हाइस सार्वजनिक, सुरक्षित आणि पूर्वी वापरलेल्या नेटवर्कसह उपलब्ध Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट करा.
Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट करा
तुमच्या होम स्क्रीनवरून, सेटिंग्ज > Wi-Fi वर जा.
Wi-Fi चालू करण्यासाठी टॅप करा. तुमचे डिव्हाइस उपलब्ध Wi-Fi नेटवर्क्स स्वयंचलितपणे शोधेल.
तुम्ही ज्या Wi-Fi नेटवर्कशी जॉईन होऊ इच्छिता त्याच्या नावावर टॅप करा. तुम्हाला कदाचित प्रथम नेटवर्कचा पासवर्ड प्रविष्ट करण्यास, किंवा अटी आणि शर्तींशी सहमत होण्यास सांगितले जाऊ शकते. जर तुम्हाला Wi-Fi नेटवर्कचा पासवर्ड माहित नसेल, तर तुमच्या नेटवर्क प्रशासकाशी संपर्क साधा.
तुमच्या स्क्रीनच्या वरच्या कोपऱ्यात नेटवर्कच्या नावाशेजारी आणि शोधा. याचा अर्थ तुम्ही यशस्वीरित्या कनेक्ट झाला आहात.

अधिक मदत मिळवा
प्रकाशनाची तारीख: