आपले AirPods कसे स्वच्छ करावे
आपले AirPods सातत्याने स्वच्छ केल्यामुळे त्यांची देखभाल करण्यात मदत होऊ शकते.
आपले AirPods ओळखणे किंवा आपले AirPods Pro स्वच्छ करणे किंवा AirPods Max हे कसे करावे हे जाणून घ्या.
आपल्या AirPods मधील मेशेस स्वच्छ करा
आपल्या AirPods 3 आणि AirPods 4 मधील मेशेस स्वच्छ करण्यासाठी, आपल्याकडे Belkin AirPods क्लीनिंग किट किंवा पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे:
- PEG-6 कॅप्रिलिक/कॅप्रिक ग्लिसराइड्स याचा समावेश असलेले मायसेलर वॉटर, जसे की Bioderma किंवा Neutrogena 
- डिस्टिल्ड वॉटर 
- सॉफ्ट ब्रिस्टल्स असलेला लहान मुलांचा टूथब्रश 
- दोन लहान कप 
- एक पेपर टॉवेल 
आपल्या AirPods 4 मधील मेशेस स्वच्छ करा
आपण आपल्या AirPods 4 मधील मेशेस स्वच्छ करू शकता. इतर भाग स्वच्छ करणे टाळा.
 
                                    
                                
                                    
                                        - एका कपमध्ये थोडेसे मायसेलर वॉटर घाला. 
- मायसेलर वॉटरच्या कपमध्ये टूथब्रशचे ब्रिसल्स पूर्णपणे भिजेपर्यंत बुडवा. 
- मेश वरच्या बाजूस असेल अशा प्रकारे आपला एअरपॉड धरा. 
- मेशवर सुमारे 15 सेकंदांसाठी वर्तुळाकार पद्धतीने ब्रश फिरवा. 
- आपला एअरपॉड उलटा करून, पेपर टॉवेलने पुसा. पेपर टॉवेल मेशला स्पर्श करत असल्याची खात्री करा. 
- आपल्याला स्वच्छ करायच्या असलेल्या प्रत्येक मेशसाठी 2-5 या पायऱ्यांची आणखी दोन वेळा (एकूण तीन वेळा) पुनरावृत्ती करा. 
- मायसेलर वॉटर धुण्यासाठी, ब्रश डिस्टिल्ड वॉटरने स्वच्छ धुवा, त्यानंतर आपण स्वच्छ केलेल्या प्रत्येक मेशसाठी 1-5 या पायऱ्यांची डिस्टिल्ड वॉटर वापरून पुनरावृत्ती करा. 
- आपले AirPods चार्जिंग केसमध्ये — ठेवण्यापूर्वी किंवा वापरण्यापूर्वी — किमान दोन तास पूर्णपणे कोरडे होऊ द्या. 
आपले AirPods 3 मधील मेशेस स्वच्छ करा
आपण आपल्या AirPods 3 मधील मेशेस स्वच्छ करू शकता. इतर भाग स्वच्छ करणे टाळा.
 
                                    
                                
                                    
                                        - एका कपमध्ये थोडेसे मायसेलर वॉटर घाला. 
- मायसेलर वॉटरच्या कपमध्ये टूथब्रशचे ब्रिसल्स पूर्णपणे भिजेपर्यंत बुडवा. 
- मेश वरच्या बाजूस असेल अशा प्रकारे आपला एअरपॉड धरा. 
- मेशवर सुमारे 15 सेकंदांसाठी वर्तुळाकार पद्धतीने ब्रश फिरवा. 
- आपला एअरपॉड उलटा करून, पेपर टॉवेलने पुसा. पेपर टॉवेल मेशला स्पर्श करत असल्याची खात्री करा. 
- आपल्याला स्वच्छ करायच्या असलेल्या प्रत्येक मेशसाठी 2-5 या पायऱ्यांची आणखी दोन वेळा (एकूण तीन वेळा) पुनरावृत्ती करा. 
- मायसेलर वॉटर धुण्यासाठी, ब्रश डिस्टिल्ड वॉटरने स्वच्छ धुवा, त्यानंतर आपण स्वच्छ केलेल्या प्रत्येक मेशसाठी 1-5 या पायऱ्यांची डिस्टिल्ड वॉटर वापरून पुनरावृत्ती करा. 
- आपले AirPods चार्जिंग केसमध्ये — ठेवण्यापूर्वी किंवा वापरण्यापूर्वी — किमान दोन तास पूर्णपणे कोरडे होऊ द्या. 
आपल्या AirPods चा मुख्य भाग स्वच्छ करा
आपल्या AirPods ला डाग लागला असल्यास किंवा त्याचे इतर कोणतेही नुकसान झाले असल्यास, - उदाहरणार्थ साबण, शाम्पू, कंडिशनर, लोशन, परफ्यूम, सॉल्व्हेंट्स, डिटर्जंट, आम्ल किंवा आम्लयुक्त खाद्यपदार्थ, कीटकनाशक, सनस्क्रीन, तेल किंवा केसांचा रंग:
- कापड ताज्या पाण्याने किंचित ओले करून त्याने ते पुसा आणि मऊ, कोरड्या, लिंट-फ्री कापडाने कोरडे करा. 
- ते चार्जिंग केसमध्ये — ठेवण्यापूर्वी किंवा वापरण्यापूर्वी — किमान दोन तास पूर्णपणे कोरडे होऊ द्या. 
आपले AirPods पाण्याखाली वापरू नका आणि आपले AirPods स्वच्छ करण्यासाठी तीक्ष्ण किंवा हानी पोहोचवणारे घटक वापरू नका.
आपल्या AirPods ची चार्जिंग केस स्वच्छ करा
- स्वच्छ, कोरडा, मऊ ब्रिस्टलचा ब्रश वापरून चार्जिंग पोर्टमधील कोणताही कचरा काढून टाका. मेटल काँटॅक्टचे नुकसान होऊ नये म्हणून, चार्जिंग पोर्टमध्ये काहीही घालू नका. 
- चार्जिंग केस मऊ, कोरड्या, लिंट-फ्री कापडाने स्वच्छ करा. आवश्यक असल्यास, आपण कापड आयसोप्रोपाइल अल्कोहोलने थोडेसे ओले करून वापरू शकता. 
- चार्जिंग केस कोरडी होऊ द्या. 
चार्जिंग पोर्टमध्ये कोणतेही द्रव पदार्थ घालू नका आणि चार्जिंग केस स्वच्छ करण्यासाठी हानी पोहोचवणारे साहित्य वापरू नका.
त्वचेचा दाह टाळा
- AirPods 3 किंवा AirPods 4 लावून वर्कआउट केल्यानंतर किंवा आपले डिव्हाइस घाम, साबण, शाम्पू, मेकअप, सनस्क्रीन आणि लोशन यांसारख्या द्रवपदार्थांच्या संपर्कात आल्यास, त्वचेचा दाह होऊ शकतो, त्यामुळे आपले डिव्हाइस स्वच्छ आणि कोरडे करा. आपले AirPods—तसेच आपली त्वचा—स्वच्छ आणि कोरडी ठेवल्याने जास्तीत जास्त आराम मिळेल आणि आपल्या डिव्हाइसला होणारे दीर्घकालीन नुकसान टाळता येईल. 
- आपल्याला काही पदार्थांबद्दल माहीत असलेल्या ऍलर्जी किंवा संवेदनशीलता असल्यास, AirPods मधील साहित्य तपासा. 
- AirPods चा घाम आणि पाणी याच्याशी संबंधित प्रतिकार याबद्दल जाणून घ्या. 
अधिक मदत मिळवा
- स्वच्छ केल्याने आपल्या समस्येचे निराकरण न झाल्यास, आपल्या AirPods साठी सेवा मिळवा. 
- आपले AirPods खराब झाल्यास, आपण रिप्लेसमेंट ऑर्डर करा. आपली समस्या Apple Limited Warranty, AppleCare+ किंवा ग्राहक कायद्याद्वारे कव्हर केली गेली नसल्यास, आपण आपले AirPods वॉरंटीबाहेर शुल्क देऊन बदलू शकता. 
